आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • RSS Mouthpiece Attacks On Hamid Ansari For Affirmative Action Remark

उपराष्ट्रपती हमीद अन्सारी यांच्‍यावर संघाच्‍या मासिकात टीका

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - उपराष्ट्रपती हमीद अन्सारी पुन्हा एकदा वादात ओढले गेले आहेत. या महिन्याच्या सुरुवातीला अन्सारी यांनी "ऑल इंडिया मजलिस-ए-मुशावरात'च्या सुवर्णजयंती कार्यक्रमात मुस्लिमांची सुरक्षा व समस्यांकडे लक्ष वेधले होते. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मुखपत्र "पांचजन्य' च्या ताज्या अंकात प्रकाशित लेखात तीव्र टीका करण्यात आली आहे.
अन्सारी यांनी मुस्लिमांच्या खराब परिस्थितीचा उल्लेख केला होता. त्यावेळी ते म्हणाले होते की, मुस्लिमांवरील बहिष्कार, भेदभाव दूर करण्यासाठी सरकारने आवश्यक पावले उचलली पाहिजेत.त्यावर संघाशी संबंधित पत्रकार सतीश पेडणेकर यांनी पांचजन्यमध्ये लेखात लिहिले अाहे की, स्वतंत्र भारताने मुस्लिमांना जातीय ओळख देऊन खूप मोठी किंमत चुकवली आहे.
त्यांना अगणित सुविधा दिल्यानंतरही मुस्लिमांची अवस्था बिकट असेल व त्यांची ओळख संकटात आहे हे न समजण्यापलिकडचे आहे. हे हिंदुंसाठी धोकादायक आहे. तथाकथित धर्मनिरपेक्ष पक्षांच्यावतीने उपराष्ट्रपती पदाचे उमेदवार असूनही हमीद अन्सारी आपल्या जातीबाहेर येऊ शकले नाहीत, असा आरोप लेखात करण्यात आला आहे.