आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Rss Mouthpiece Defends Dadri Says Vedas Order Killing Of Cow Killers

अखलाखकीची हत्‍या वेदानुसारच, \'पाञ्चजन्य\'मधून RSS ने केले समर्थन

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - उत्‍तर प्रदेशातील दादरी हत्‍याकांडामुळे जगभर भारताची नाच्‍चकी होत असताना राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (आरएसएस)ने आपल्‍या 'पाञ्चजन्य' या मुखपत्रातूनत प्रसिद्ध केलेल्‍या कव्‍हर स्‍टोरीतून या हत्‍याकांडाचे समर्थन केले आहे. एवढेच नाही तर या विश्‍लेषत्‍माक लेखात म्‍हटले, '“गोहत्या करणारा पापी असतो. त्यामुळे त्याला ठार करा, असा आदेश वेदांमध्ये दिला आहे. देशातील सर्व मदरशांमधील मौलवी विद्यार्थ्यांमध्ये भारतीय संस्कृतीविषयी द्वेषभावना निर्माण होईल, याचीच शिकवण देतात. दादरी येथील अखलाक याने कदाचित कुकर्मातूनच गायीची हत्या केली असावी, त्यामुळेच त्याला त्याचे प्रायश्चित्त मिळाले”, असे ‘पाञ्चजन्य’मध्ये म्हटले आहे. आरएसएस ही भाजपची मातृसंस्‍था आहे. या लेखामुळे भाजपच्‍या अडचणी वाढणार आहे.
लेखात नेमके काय म्‍हटले
>'इस उत्पात के उस पार' या मथळ्याखाली हा लेख आहे. यामध्‍ये लिहिले, ''गायीची हत्‍या करणाऱ्या पापींचे प्राण घ्‍या. आमच्‍यासाठी हा जीवनमारणाचा प्रश्‍न आहे. ''
>''अनेक वर्षांपासून गोवध आमच्‍यासाठी महत्‍त्‍वाचा मुद्दा आहे. आमच्‍या पूर्वजनांनी गोवहत्‍या थांबवण्‍यासाठी प्राणाची बाजी लावली. इतिहात अनेक वेळा मुस्‍लीम घुसखोरांनी हिंदूंचे धर्मांत करताना त्‍यांच्‍या तोंडात बीफ घुसवले''
> या लेखाचे लेखक विनय कृष्ण चतुर्वेदी म्‍हणाले, ''यजुर्वेदमध्‍ये लिहिले आहे की, जे लोक गाय मारतात, त्‍यांना मृत्‍यूदंड द्यावा. गोहत्या हिंदुसाठी मान बिंदू (प्रतिष्‍ठेचा प्रश्न) आहे. जे मुस्लिम असे कृत्‍य करत आहेत. ते भारतीय मुळाचे धर्मांरित हिंदू आहेत. सामाजिक सद्भाव गरजेचा आहे. त्‍यामुळे आपण एकमेकांच्‍या आस्‍थेचा सन्‍मान करणे गरजेचे आहे. ''
> या लेखात पुरस्‍कार परत करणाऱ्या साहित्यिकांचाही समाजाचार घेण्‍यात आला. त्‍यात म्‍हटले हे लोक आतापर्यंत का चूप होते. तुम्‍हाला अखलाकने केलेली गोहत्‍या दिसली नाही.'' असा प्रश्‍न उपस्‍थ‍ित करून ही गोहत्‍येच्‍या विरुद्ध उमटलेली स्‍वाभाविक आणि नैसर्गिक‍ प्रतिक्रिया आहे.
पुढील स्‍लाइड्सवर वाचा, नेत्‍यांचे वादग्रस्‍त व्‍यक्‍तव्‍य....