आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Rss Mouthpiece Defends Dadri Says Vedas Order Killing Of Cow Killers

बीफच्‍या वक्‍तव्‍यावर मोदी नाराज, शाहांची खट्टर-सोम-साक्षी यांना वॉर्निंग

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - गोहत्‍या, दादरी हत्‍याकांड आणि बीफवर भाजपच्‍या अनेक नेत्‍यांनी वादग्रस्‍त व्‍यक्‍तव्‍य केले आहे. त्‍यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रचंड नाराज झालेत. सूत्रांच्‍या माहितीनुसार, या मुद्दयाला धरून भाजपचे राष्‍ट्रीय अध्‍यक्ष अमित शाह यांनी आज (रविवार) हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर, खासदार साक्षी महाराज, मुजफ्फरनगरच्‍या सरधनाचे आमदार संगीत सोम, खासदार संजीव बालियान आणि केंद्रीय मंत्री महेश शर्मा यांना आपल्‍या घरी बोलावले आणि जिभेवर नियंत्रण ठेवण्‍याचे आदेश दिले. दरम्‍यान, आपल्‍याला पक्षांच्‍या नियोजनावर चर्चा करण्‍यात बोलवण्‍यात आले होते, असे आमदार संगीत सोम यांनी म्‍हटले.
- भाजप नेत्‍यांचे वादग्रस्‍त व्‍यक्‍तव्‍य

मुस्‍लीमांनी बीफ खाणे सोडावे - खट्टर
हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांनी दादरीमध्ये झालेली घटना ही गैरसमजातून झाली असल्याचे म्हटले आहे. ते म्हणाले मुस्लीम या देशात राहू शकतात पण त्यासाठी त्यांनी बीफ खाणे बंद करावे लागेल, असे वक्‍त्‍वव्‍य त्‍यांनी केली.
गोमातेचा अपमान केला तर मारून टाकू : साक्षी महाराज
साक्षी महाराज म्हणाले, गाय ही आमच्‍यासाठी आई आहे. तिचा अपमान आम्‍ही सहन करू शकत नाही. गोहत्या करून नागरिकांच्या धार्मिक भावनांबाबत खेळण्याचा अधिकार कोणाला नाही. गोहत्येला जबाबदार असलेल्याला फाशीची शिक्षा दिली पाहिजे, असे म्‍हणत त्‍यांनी खट्टर यांच्‍या वक्‍तव्‍याचे समर्थन केले. एवढेच नाही तर गाईसाठी जिवावर उदार होऊन मारून टाकू, असेही ते म्‍हणाले.
ते बीफ खातात ते मनोरुब्ग : आदित्यनाथ
कुणी जर बीफ खाण्‍याचे समर्थन करत असेल तर ती व्‍यक्‍ती मनोरुग्‍ण आहे. उत्‍तर प्रदेश सरकारने दादरी कांडाला राजकीय स्‍वरुप दिले आहे. हत्‍या झालेला अखलाक हा पाकिस्तानात गेला होता, असे मी एका वृत्‍तपत्रात वाचले आहे. त्‍या नंतर त्‍याचे वागणे संशयास्‍पद होते. तो पाकिस्‍तानात का गेला होता, याची माहिती सरकारने घेतली नाही, असे खासदार महंत आदित्यनाथ म्‍हणाले.

गाय कापणा-याला सरकार विमानात बसवते : संगीत सोम
बिसहाडा गावात गोहत्‍या केल्‍यानंतर हिंसा झाली. पण, यूपी सरकारने गाय कापणा-यांना विमान बसवले शिवाय 50 लाख रुपयेसुद्धा दिले, असे व्‍यक्‍तव्‍य खासदार संगीत सोम यांनी केले.
महेश शर्मा यांनी म्‍हटले होते गैरसमजुतीतून हत्‍या केंद्रीय सांस्‍कृतिक मंत्री महेश शर्मा या घटनेविषयी शोक व्‍यक्‍त केला होता. शिवाय हे कृत्‍य गैरसमजूतीतून झाल्‍याचे त्‍यांनी म्‍हटले होते.

पुढील स्‍लाइड्सवर वाचा कोण काय म्‍हणाले...