आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • RSS Mouthpiece Organiser Shows Jammu & Kashmir In Pakistan

RSS चे मुखपत्र ऑर्गनायझरच्या लेखातील नकाशात जम्मू-काश्मीर पाकिस्तानमध्ये

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मुखपत्र असलेल्या ऑर्गनायझर या साप्ताहिकाच्या एका लेखात जम्मू काश्मीरचा काही भाग पाकिस्तानमध्ये असल्याचा नकाशा प्रकाशित करण्यात आला आहे. या प्रकारामुळे सगळीकडे एकच खळबळ उडाली आहे.
फोटो - ऑर्गनायझरमधील लेखात प्रकाशित केलेला हाच तो नकाशा.
विशेष म्हणजे जम्मू काश्मीरच्या मुद्यावर वेळोवेळी भडक वक्तव्य करणाऱ्या आरएसएसच्या मुखपत्रात ही चूक झाल्याने मोठा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.

इतर काही देशांनी जेव्हा अशा प्रकारे जम्मू काश्मीरचा भाग भारतात नसल्याचे दाखवणारे नकाशे प्रकाशित केले त्यावेळी टीका करण्यात आरएसएस आघाडीवर होते. या प्रकारानंतर ऑर्गनायझरने ऑनलाइन आवृत्तीमधील हा वादग्रस्त नकाशा लगेचच मागे घेतला. पण 15 मार्च तारखेच्या प्रिंट करण्यात आलेल्या प्रतिंवर मात्र हाच नकाशा आहे.
ही एक अत्यंत मोठी चूक असून कोणत्याही स्थितीत या चुकीचे समर्थन करता येणार नसल्याचे ऑर्गनायझरचे संपादक प्रफुल्ल केतकर यांनी एका इंग्रजी वृत्तपत्राशी बोलताना सांगितले. हा नकाशा सार्कच्या संकेतस्थळावरून घेण्यात आला होता. पण कोणतेही कारण यासाठी देता येणार नाही असेही त्यांनी स्पष्ट केले. तसेच लगेचच ही चूक दुरुस्त करण्याचे आश्वासनही त्यांनी दिले.