आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Rss Mulls Building 120 Kamdhenu Nagars News In Marathi

गोवंश वाचवण्यासाठी RSS देशभरात 120 कामधेनु नगर उभारणार

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- गोवंश वाचवण्यासाठी देशभरात 120 कामधेनु नगर उभारण्याची मनिषा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने व्यक्त केली आहे. यासाठी संघाने पश्चिम बंगाल, मध्यप्रदेश, गुजरात आणि राजस्थानातील 100 पेक्षाजास्त ठिकाणांची निवड केली आहे.
हिंदु परंपरेचे पावित्र्य राखायला हवे. पवित्र मानले जाणार्‍या प्राण्यांचा आपण आदर करायला हवा, अशी भावना संघाने व्यक्त केली आहे. कामधेनु नगरात गोशाळा असतील. तसेच या गोशाळा नागरी वसाहतींच्या जवळपास उभारल्या जातील.

गोवंश वाचवण्यासाठी देशवासियांनी पुढे येण्याची आवश्यकता आहे. नागरी वसाहतीत राहाणार्‍याशी आमची चर्चा सुरु असून लवकरच यावर अमंलबजावणी करण्‍यात येणार असल्याचे अखिल भारतीय गौसेवाचे अध्यक्ष शंकरलाल यांनी म्हटले आहे.

हे देखील संघाच्या एजेंड्यावर...
यंदा आश्रमशाळांमध्ये 80 गोकुल गुरूकुल सुरु करणे, गोधन आधारित शेतीला प्राधान्य देणे, तुरुंगात गोशाळा, शाळांमध्ये शिष्यवृत्तीसाठी गोवंश संदर्भात परीक्षा, गोवंश विज्ञान, प्रत्येक राज्यात गायींसाठी अभयारण्य, मंदिरांमध्ये गौ कथा सप्ताहाचे आयोजन करणे, आदी मुद्‍दे विचाराधीन आहेत.