आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • RSS Not Happy With Modi Government, Expresses Concern Over Rising Food Prices

भाजपच्या आर्थिक धोरणांवर संघ नाराज, अमित शाहांना सांगितले चिंतेचे कारण

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फाइल फोटो : पंतप्रधान नरेंद्र मोदी

नवी दिल्‍ली - भाजप सरकारच्या आर्थिक धोरणांबाबत आसएसएस नाराज असून पक्षाचे अध्यक्ष अमित शाह यांच्याकडे संघाने आपली नाराजी व्यक्त केली आहे. महागाई आणि आर्थिक नियोजनाशी संबंधित मुद्यांसंदर्भात भाजपने घेतलेल्या बेजबाबदार भूमिकेबाबतही संघाने चिंता व्यक्त केली आहे. आगामी काळात विविध राज्यांमध्ये होणा-या विधानसभा निवडणुकांमध्ये या कारणांमुळे भाजपला नुकसान होण्याची शक्यता संघाने वर्तवली आहे. उत्तराखंडमध्ये नुकत्याच झालेल्या निवडणुकामध्ये काँग्रेसने मोठे यश मिळवल्याने संघाच्या चिंता वाढल्या आहेत.
संघाचे शाह यांना संकेत
संघाने शाह यांना म्हटले आहे की, पक्षाला विविध मुद्यांवर आपल्या मतानुसार निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य आहेच, पण महागाई आणि इतर आर्थिक मुद्यांबाबत भाजपच्या भुमिकेमुळे पक्षाला आगामी विधानसभा निवडणुकांमध्ये मोठ्या प्रमाणावर नुकसान होऊ शकते याचाही पक्षाने विचार करायला हवा. सुत्राने दिलेल्या माहितीनुसार, सरकारवर अशलेल्या अपेक्षांच्या ओझ्याचे रुपांतर हळूहळू निराशेमध्ये होत आहे. उत्तराखंडमध्ये नुकत्याच झालेल्या पोटनिवडणुकीतील निकालांकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. तसेच दिल्लीत होणा-या निवडणुकांमुळेही चिंता वाढल्या आहेत.

संघाच्या चिंतेचे कारण
आगामी निवडणुकांमध्ये भाजपची कामगिरी कशी होणार, हे संघाला चिंतेने ग्रासल्याचे मुख्य कारण आहे. निवडणूक विश्लेषक संजय कुमार यांच्या मते, सीएसडीएस (सेंटर फॉर द स्‍टडी ऑफ डेव्हलपिंग सोसायटी) ने नुकतेच एख सर्व्हेक्षण केले. त्यात जेव्हा लोकांना मतदानावर कोणता मुद्दा सर्वाधिक प्रभाव टाकतो असे विचारण्यात आले, त्यावेळी सुमारे 22 टक्के लोकांनी महागाई असे उत्तर दिले. तर 18 टक्के लोकांनी विकास आणि 16 टक्के लोकांनी भ्रष्टाचार असे सांगितले. जामिया मिलिया इस्‍लामियाचे समाजशास्‍त्राचे प्राध्यापक डॉक्‍टर सव्‍यसाची यांच्या मते, 'आर्थिक मुद्याचा विचार करता कोणत्याही सरकारची कामगिरी आणि त्याची विचारप्रणाली याचा थेट संबंध नसतो. पण हे जबाबदारी स्वीकारण्याचे प्रकरण आहे. सरकार आंकडे लपवू शकते. पण संघाने ज्या आवेशाने भाजपसाठी काम केले, त्यामुळे संघ लोकांना उत्तर देण्यास जबाबदार ठरतो. त्यामुळेच संघाच्या चिंता अधिक वाढल्या आहेत.'