आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Rss Organizes Iftar Party For The First Time . Latest News In Marathi

RSS ने पहिल्यांदा दिली \'इफ्तार की दावत\', सहभागी झाले 37 मुस्लिम पाहुणे

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
इफ्तार पार्टीत सहभागी झालेले इंद्रेश कुमार (पिवळा कुर्ता परिधान केलेले) - Divya Marathi
इफ्तार पार्टीत सहभागी झालेले इंद्रेश कुमार (पिवळा कुर्ता परिधान केलेले)
नवी दिल्ली- राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने (आरएसएस) शनिवारी (4 जुलै) रमजाननिर्मित्त
पहिल्यांदा इफ्तार पार्टी आयोजित केली. आरएसएसची मुस्लिम शाखा 'मुस्लिम राष्ट्रीय मंच'ने संसदेच्या उपभवनात पार्टीने आयोजन केले होते. आरएसएसचे ज्येष्‍ठ नेते इंद्रेश कुमार यांच्यासह केंद्रीय मंत्री डॉ. हर्षवर्धन यावेळी उपस्थित होते. देशातील अनेक मुस्लिम नेते तसेच यमन, इराक आणि मिस्रसह 16 देशांतील 37 मुस्लिम पाहुणे सहभागी झाले होते.

देशातील विविध धर्मांच्या लोकांनी एकमेंकांना विरोध न करता सहकार्य करावे. सर्व धर्मांचा आदर करायला हवा. अरबी कुरानमध्ये 'इस्लाम' या शब्दाचा अर्थ 'शांती' असा सांगितला आहे. त्याचप्रमाणे मोहम्मद पैगंबर यांनीही राष्‍ट्रीय एकतेचा संदेश दिला असल्याचे इंद्रेश कुमार यांनी सांगितले.
RSS विषयी पसरलेला गैरसमज दूर करण्याचा प्रयत्न
देशातील काही भागातील मुस्लिम बांधवांमध्ये RSS विषयी गैरसमज आहे. हा गैरसमज दूर करण्‍यासाठी तसेच देशात बंधुत्वाचा संदेश देण्याचा आमचा प्रयत्न असल्याचे इंद्रेश कुमार यांनी सांगितले. या इफ्तार पार्टीचा राजकीय अर्थ काढू नये. हा एक सामाजिक कार्यक्रम असल्याचेही कुमार यांनी म्हटले आहे. 'मुस्लिम राष्ट्रीय एकता मंच'च्या माध्यमातून रमजाननिमित्त देशभरात अनेक कार्यक्रमांचे आयोजन करण्‍यात आले आहे.
काही समाजकंटकांनी देशात आरएसएसविषयी चुकीचा संदेश पोहोचवला आहे. मुस्लिम बांधवांमधील हा गैरसमज दूर करू, असे आश्वासन मुस्लिम नेता आणि धर्मगुरु मौलाना सुहैन कासमी यांनी यावेळी केले.

पंतप्रधान आणि राष्ट्रपतींची अनुपस्थिती
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनाही या कार्यक्रमाचे निमंत्रण पाठवण्यात आले होते. परंतु ते काही कारणास्तव उपस्थित राहू शकले नसल्याचे सूत्रांनी सांगितले.
पुढील स्लाइडवर क्लिक करून पाहा, आरएसएसने दिलेल्या इफ्तार पार्टीचे फोटो...