आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Rss Plans To Put More More Iftar Parties Pm Modi May Too

RSS चे युपीत \'ईद मिलन\'; उलेमा मीटचे आयोजन, पंतप्रधान देणार इफ्तार पार्टी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
इफ्तार पार्टीत सहभागी झालेले इंद्रेश कुमार (पिवळा कुर्ता परिधान केलेले) - Divya Marathi
इफ्तार पार्टीत सहभागी झालेले इंद्रेश कुमार (पिवळा कुर्ता परिधान केलेले)
नवी दिल्ली- राजधानीत नुकतीच 'इफ्तार की दावत' देणार्‍या हिंदुत्त्ववादी संघटना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने (आरएसएस) आता सामुदायिक मुद्द्यावर संवेदनशील मानल्या जाणार्‍या उत्तर प्रदेशावर लक्ष केंद्रीत केले आहे. रमजाननिर्मित आरएसएसने उत्तरप्रदेशात इफ्तार पार्टी आणि ईद मिलनाचे भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. इतकेच नव्हे तर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देखील इफ्तार पार्टी देणार असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा सुरु झाली आहे. आरएसएसने ऑगस्ट महिन्यात एक 'उलेमा मीट' ठेवण्याची देखील योजना आखली आहे.

मिळालेली माहिती अशी की, पंतप्रधान मोदी 17 जुलैला जम्मू-काश्मीरचा दौरा करणार आहेत. माजी खासदार आणि मंत्री गिरधारी लाल डोगरा यांच्या 100व्या वाढदिवसानिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमाला नरेंद्र मोदी उपस्थित राहातील. 17 जुलैला शुक्रवार आहे. विशेष म्हणजे रमजान ईदच्या आधीचा अंत‍िम जुम्मा आहे. ईद 18 किंवा 19 जुलैला साजरी करण्यात येणार आहे. यानिर्मित नरेंद्र मोदी इफ्तार पार्टी देऊ शकतात.

काय आहे आरएसएसचा कार्यक्रम
आरएसएसतर्फे मुरादाबाद जिल्ह्यात मंगळवारी (7 जुलै) इफ्तार पार्टीचे आयोजन करण्‍यात आले होते. आरएसएसची सहयोगी शाखा मुस्लिम राष्ट्रीय मंच (एमआरएम) 8 ऑगस्टला लखनौमध्ये उलेमाचे ऑल इंडिया मीटचे आयोजन केले आहे. त्याचबरोबर 18 जुलैला
लखनौ, कानपूर, गोरखपूर, अलाहाबाद, वाराणसी, मीरजापूर, बांदा, झांसी, आग्रा, अलीगड, मुरादाबाद, सहारनपूर, मुजफ्फरनगर आणि बरेलीमध्ये ईद मिलन कार्यक्रम होणार आहे.
आरएसएस प्रचारक महिराजध्वज सिंह यांनी सांगितले की, लखनौमध्ये पुढील आठवड्यात इफ्तार पार्टीचे आयोजन करण्‍यात येणार आहे.

उन्नाव, कानपूर, बाराबंकी, सीतापूर आणि हरदोई येथील मुस्लिम बांधवांना पार्टीसाठी निमंत्रित करण्‍यात आले आहे. या कार्यक्रमातून आम्हाला सामुदायिक एकतेचा संदेश द्यायचा आहे. तसेच इफ्तार पार्टीही आम मुस्लिम बांधवांसाठी आहे. यात धर्मगुरुंना बोलवण्यात येणार नाही.
ईद मिलन कार्यक्रमात विविध धर्माच्या लोकांनाही बोलावले जाईल. यात 30 मिनिटांचे एक विशेष सत्रही ठेवण्यात येणार आहे. सामुदायिक एकतेविषयी चर्चा केली जाणार असल्याचे सिंह यांनी सांगितले आहे.