आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • RSS Pracharak Sunil Joshi Murder Case: NIA Claimed Joshi Made Sexual Advances Towards Sadhvi Pragya Singh Thakur

NIA चा दावा : साध्वी प्रज्ञा ठाकूरच्या लैंगिक आकर्षणातून संघ प्रचारक सुनील जोशीची हत्या

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (आरएसएस) प्रचारक सुनील जोशी यांच्या 2007 मध्ये झालेल्या हत्येचा तपास करणार्‍या राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) खळबळजनक खुलासा केला आहे. एनआयएचे म्हणणे आहे, की साध्वी प्रज्ञासिंह ठाकूरकडे सुनील जोशी आकर्षित झाले होते. या लैंगिक आकर्षणातूनच जोशीची हत्या झाल्याचा दावा एनआयएने केले आहे.
इंग्रजी दैनिक इंडियन एक्स्प्रेसने या संबंधीतील वृत्त प्रकाशित केले आहे. या वृत्तानुसार तपास यंत्रणा पुढील आठवड्यात आरोपपत्र दाखल करणार आहे. यात साध्वी प्रज्ञासिंहचे नाव आरोपींमध्ये आहे. मध्यप्रदेशातील देवास पोलिस स्टेशनमध्ये याआधीच साध्वीचे नाव आरोपींच्या यादीत आहे. प्रज्ञा ठाकूरवर महाराष्ट्रातील मालेगाव बॉम्बस्फोटाचा (2008) देखील आरोप आहे.
प्रज्ञा ठाकूरला भीती होती जोशी पोलखोल करेल
एनआयएने दावा केला आहे, की जोशीचे प्रज्ञा ठाकूरबद्दल लैंगिक आकर्षण वाढले होते आणि त्याच्या हत्येचे हे देखील एक कारण आहे. तर, दुसरीकडे प्रज्ञा ठाकूरला भीती होती, की तिच्या दहशतवादी कारवायाचीं संपूर्ण माहिती सुनील जोशीला होती आणि तो ही माहिती उघड करु शकतो.
एनआयएच्या आरोपपत्रामध्ये, अजमेर ब्लास्टचा देखील उल्लेख येण्याची शक्यता आहे. या स्फोटांच्या योजनेबद्दल जोशीला माहित होते. त्याने ही माहिती उघड करु नये यासाठी प्रज्ञा ठाकूरने आनंदराज कटारियाला जवळपास 10 दिवस स्वतःच्या घरात डांबून ठेवले होते. देवास पोलिसांनी कटारियाला देखील या हत्येच्या प्रकरणात आरोपी केले होते. मात्र, एनआयएच्या अंतिम यादीत त्याचे नाव नाही.

एनआयए पाच लोकांना आरोपी करणार
मालेगाव स्फोटाशी संबंधीत मध्यप्रदेशातील महू येथून काही लोकांना 2011 मध्ये जेव्हा अटक करण्यात आली तेव्हा जोशी हत्या प्रकरणाच्या तपासात मोठा सुगावा लागला आणि तपासाची दिशाच बदलली. याचवेळी देवास पोलिसांनी पहिले आरोपपत्र दाखल केले. प्रज्ञा ठाकूरसोबत एनआयए आता राजेंद्र चौधरी, लोकेश शर्मा,भारतीय जनता युवा मोर्चाचा नेता जितेंद्र शर्मा आणि बलबीर सिंह यांना जोशी हत्याकांडात आरोप करणार आहे. तपास यंत्रणेचा दावा आहे, की राजेंद्र आणि लोकेश यांनी 29 डिसेंबर 2007 च्या रात्री जोशीची हत्या केली होती. जितेंद्र शर्माने यासाठी पिस्तूल उपलब्ध करुन दिली होते, तर बलबिरसिंहने ते लपविली होते.
मोठ्या हल्ल्याची होती योजना
एनआयएचा दावा आहे, की लोकेश, राजेंद्र आणि जोशी एक मोठी योजना आखत होते. या योजनेनुसार मुस्लिमांना मोठ्या प्रमाणात लक्ष्य केले जाणार होते.

पुढील स्लाइडमध्ये वाचा, कोण आहे सुनील जोशी

छायाचित्र : मालेगाव स्फोटातील आरोपी साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर