आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • RSS Refutes Talks Of Declaring Pm Candidature Of Narendra Modi

मोदींच्‍या उमेदवारीबाबत बैठक नव्‍हती, निवडणुकीवर झाली चर्चाः संघाची स्‍पष्‍टोक्ती

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्‍ली- पंतप्रधानपदाचे उमेदवार म्‍हणून गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांच्‍या नावाची घोषणा करण्‍याबाबत सुरु झालेल्‍या चर्चेनंतर राष्‍ट्रीय स्‍वयंसेवक संघाने सारवासारव करण्‍याचा प्रयत्‍न केला आहे. भारतीय जनता पक्ष आणि संघाच्‍या समन्‍वय समितीची बैठक झाली. त्‍यात मोदींच्‍या उमेदवारीबाबत चर्चा झाली नाही, असे संघाचे प्रवक्ते मनमोहन वैद्य यांनी स्‍पष्‍ट केले.

दिल्‍लीत स‍मन्‍वय समितीची बैठक संपल्‍यानंतर वैद्य यांना पत्रकारांनी मोदींबाबत प्रश्‍न विचारला. त्‍यावेळी ते म्‍हणाले, की बैठकीत आगामी निवडणुकांबाबत चर्चा झाली. बैठकीत आर्थिक प्रश्‍नांबाबतही चर्चा झाली. मोदींचा विषय बैठकीत नव्‍हता. मोदींच्‍या उमेदवारीबद्दल चर्चा करण्‍यासाठी बैठक आयोजित करण्‍यात आलेली नव्‍हती, असेही त्‍यांनी स्‍पष्‍ट केले.

नरेंद्र मोदी यांच्‍या पंतप्रधानपदाच्‍या उमेदवारीचा मार्ग मोकळा झाला आहे, अशी चर्चा होती. त्‍यांच्‍या नावाला संघाने हिरवा कंदील दिल्याचेही सांगणत येत होते. रविवारी भाजप नेत्यांना तसे कळवण्यात आले. 20 सप्टेंबरपासून पितृपक्ष सुरू होत आहे. तत्पूर्वी मोदींच्या नावाची घोषणा केली जाऊ शकते, असे चित्र रंगवण्‍यात आले होते. परंतु, संघाने या चर्चांना दुजोरा दिला नाही.