आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संघ शताब्दीवर्षी देशभर एक लाख शाखांचे उद्दिष्ट, दरमहा 8 हजार नवे सदस्य

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या देशभरात ५७ हजार १२० शाखा अाहेत. २७ सप्टेंबर २०२५ राेजी संघाला शंभर वर्षे पूर्ण हाेत अाहेत, ताेपर्यंत एक लाख शाखा उभारण्याचे लक्ष्य अाहे. दुसरीकडे संघाच्या सदस्यत्वासाठी अाॅनलाईन नाेंदणी सुरू असून दर महिन्याला सरासरी ८ हजार नवे सदस्य हाेत अाहेत. त्यात तरुणांची संख्या अधिक अाहे.
 
संघाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अाॅनलाईन सदस्यता नाेंदणीस उत्तम प्रतिसाद मिळत अाहे. केंद्रात भाजपचे सरकार अाल्यानंतर संघालाही चांगले दिवस अाले अाहेत. भाजपप्रमाणेच संघाचीही सदस्यवाढ  माेठ्या प्रमाणात हाेत अाहे. २०१३ मध्ये २८ हजार सदस्यांची अाॅनलाईन नाेंदणी झाली. हा अाकडा २०१४ मध्ये ९७ हजारावर गेला. या मोहिमेद्वारे २०१५ मध्ये ८१ हजार ६०० पेक्षा अधिक, तर २०१६ मध्ये ८५ हजार अर्ज आले. या वर्षी जानेवारी ते मार्च या तीन महिन्यांच्या काळात संघात सहभागी हाेण्यासाठी ५० हजार नव्या स्वयंसेवकांनी अाॅनलाईन नाेंदणी केली अाहे.
 
नुकत्याच झालेल्या पंजाब, उत्तराखंड, उत्तर प्रदेश, गाेवा अाणि मणिपूर या राज्यांतून संघात सहभागी हाेण्यासाठी सर्वाधिक अर्ज प्राप्त झाले आहेत.स्वयंसेवक हाेण्यासाठी अाॅनलाईन अर्ज केलेल्या प्रत्येकालाच सदस्य करून घेतले जात नाही. त्यांच्यात राष्ट्रप्रेम अाणि सेवा या बाबी अाहेत किंवा नाही हे तपासले जाते. अर्जदारांचा मेळावा घेतला जाताे.
बातम्या आणखी आहेत...