आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

युवकांना आकर्षित करण्‍यासाठी RSS ने केली गणवेश बदलण्‍याची तयारी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्‍ली - राष्‍ट्रीय स्‍वयंसेवक संघ (RRS) आणि खाकी हाफ पॅण्‍ट हे चित्र भारतात रुढ झाले आहे. खाकीच्‍या हाफ चड्डीमुळे संघाला विशेष ओळख मिळाली असून, आता युवकांना आकर्षित करण्‍यासाठी संघ हाफ पॅण्‍टऐवजी फूट पॅण्‍टचा विचार करत आहे.या नव्‍या गणवेशात काळा किंवा निळा फूल पायजमा आणि पांढरे टीशर्ट असू शकतो, अशी माहिती सूत्रांकडून मिळाली. एका आठवड्यापूर्वी रांची येथे झालेल्‍या बैठकीत या बाबत चर्चा झाली. याला संघ प्रमुख मोहन भागवत आणि सह सरकार्यवाह भय्याजी जोशी यांनीही याला पाठिंबा दिला आहे.
या दोन ड्रेसकोडवर होत आहे विचार
1. पांढरे टी-शर्ट आणि काळा पायजमा या दोघांपैकी कुठल्‍याही एका रंगाची टोपी. पांढरे कॅनवास शूज आणि खाकी मौजे.
2. फुल स्लीव्स पांढरे शर्ट. खाकी, नेव्‍ही ब्लू किंवा ग्रे कलरची फूल पॅण्‍ट. ब्‍लॅक लेदर किंवा रेक्सीन शूज. खाकी मौजे. कॅनवास बेल्ट आणि ब्‍लॅक कॅप.
कधी होणार बदल ?
येणा-या वर्षात नागपूर येथे होणा-या संघच्‍या अखिल भारतीय शिबिरामध्‍ये या बाबत अंतिम निर्णय होऊ शकतो. हा नवीन गणवेश कधीपासून आणि कसा लागू करायचा याचीही चर्चा यामध्‍ये होऊ शकते.
किती ड्रेसची गरज भासणार ?
> देशात संघाच्‍या 50,000 शाखा आहेत. प्रत्‍येक शाखेत 10 हजार स्वयंसेवक आहेत. त्‍यामुळे अशा प्रकारच्‍या 5 लाख गणवेशाची गरज भासणार आहे.
> वर्ष 2010 मध्‍ये संघाचे आपल्‍या ड्रेसकोडमध्‍ये लेदर बेल्टच्‍या ऐवजी कॅनवास बेल्ट असा शेवटचा बदल केला होता.
आता पर्यंत गणवेशात झालेला बदल ?
> संघाची स्‍थापना झाली त्‍यावेळी वर्ष 1925 पासून 1939 पर्यंत संघाचा गणवेश पूर्णपणे खाकीचा होता. लाल रंगाचा लेदर बेल्‍ट घातला जाई.
> 1940 मध्‍ये पांढरे फुल स्लीव्स शर्ट लागू केले गेले.
> 1973 मध्‍ये लेदर शूजच्‍याऐवजी लॉन्गबूट आणले गेले. दरम्‍यान, रेक्सीनच शूजचाही विचार केला गेला होता.
> वर्ष 2010 मध्‍ये संघाने आपल्‍या ड्रेसकोडमध्‍ये लेदर बेल्टच्‍या ऐवजी कॅनवास बेल्ट असा शेवटचा बदल केला होता.

पुढील स्लाइड्सवर पाहा इन्फोग्राफिक्स....
बातम्या आणखी आहेत...