आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

केंद्रीय मंत्र्यांच्या स्टाफला RSS च्या शाखेत हजर राहाण्याचे आदेश

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - केंद्रीय मंत्र्यांच्या खासगी कर्मचार्यांना संघाच्या शाखांमध्ये हजर राहाण्यास सांगण्यात आले आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (आरएसएस) कार्यालय केशवकुंज येथे दर रविवारी शाखा भरते, त्यासाठी मंत्र्यांच्या खासगी कर्मचार्‍यांनी नियमीत हजर राहिले पाहिजे, असे सांगण्यात आले आहे.
सूत्रांचे म्हणणे आहे, की काही दिवसांपूर्वी संघाच्या पदाधिकार्‍यांसोबत केंद्रीय मंत्र्यांची बैठक झाली यात यावर चर्चा करण्यात आली. मंत्र्यांचे खासगी कर्मचारी यांनी आठवड्यातील एक दिवस (दर रविवारी) संघाचे कार्यालय केशवकुंज येथे शाखेत सहभागी झाले पाहिजे. मंत्र्यांनी याला संमती दर्शवली आहे. तेव्हा पासून मंत्र्यांच्या स्टाफ मधील खासगी कर्मचार्‍यांना शनिवारी सायंकाळी फोन किंवा एसएमएस करुन रविवारी सकाळी 6.30 वाजता उपस्थित राहण्यास सांगितले जाते. येथे हजर राहाणे बंधनकारक असल्याचे एसएमएसमध्ये सांगितले जाते. शाखेची वेळ सकाळी 6.30 ते 8 पर्यंत असते.