आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सुषमांवर नवा आरोप: पती-मुलीला MP सरकारने सुप्रीम कोर्टात बनविले वकील!

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- ललित मोदींना मदत केल्याप्रकरणी वादात सापडलेल्या परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांच्यावर आणखी एक आरोप झाला आहे. आरोप आहे की, मध्य प्रदेश सरकारने सुषमा यांचे पती स्वराज कौशल आणि मुलगी बांसुरी कौशल हिला सुप्रीम कोर्टात राज्याचे प्रतिनिधित्व करण्यासाठी वकील म्हणून नियुक्त केले आहे.
भोपाळमधील आरटीआय कार्यकर्ता अजय दुबे यांनी हा आरोप करीत या नियुक्ती प्रक्रियेची चौकशी करण्याची मागणी केली आहे. सुषमाचे पती स्वराज आणि मुलगी बांसुरी सुप्रीम कोर्टात वकील आहेत आणि हे दोघे मध्य प्रदेश सरकारशी संबंधित प्रकरणाची बाजू मांडतात. दुसरीकडे, आप कार्यकर्त्यांनी दिल्लीत सुषमांच्या घराबाहेर प्रदर्शन-आंदोलन करीत आहेत. तसेच सुषमा यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.
भाजपने आरोप फेटाळले-
भाजपचे प्रदेश प्रवक्ते हितेश वाजपेयींनी म्हटले आहे की, परराष्ट्र मंत्री सुषमा यांचे पती स्वराज कौशल आणि मुलगी बांसुरी यांच्यावर मध्य प्रदेश सरकारने कोणतेही मेहेरबानी दाखवलेली नाही. ही एक कायदेशीर प्रक्रिया असून, ती पूर्ण गेली आहे. यापूर्वीही काँग्रेस नेता कपिल सिब्बल आणि पी. चिदंबरम यासारख्या नेत्यांनी अनेक सरकारची सुप्रीम कोर्टात बाजू मांडली आहे. यात वावगे असे काहीही नाही. आपल्या माहितीसाठी, मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांच्या कथित डंपर घोटाळ्यादरम्यान 2013 मध्ये बांसुरी स्वराज जबलपुर हायकोर्टात बाजू मांडली होती.
बातम्या आणखी आहेत...