आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

केजरीवाल यांच्‍या पत्रकार परिषदेत गोंधळ, अण्‍णांना फसविल्‍याचा आरोप

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

आम आदमी पार्टीचे नेते अरविंद केजरीवाल यांच्‍या पत्रकार परिषदेमध्‍ये एका कार्यकर्त्‍याने अचानक गोंधळ घातला. हा कार्यकर्ता भारतीय जनता पक्षाचा असल्‍याची माहिती असून केजरीवाल यांनी अण्‍णा हजारेंच्‍या नावाचा वापर केल्‍याचा आरोप या कार्यकर्त्‍याने केला आहे.

नचिकेत वाल्‍हेकर असे या कार्यकर्त्‍याचे नाव असून तो अहमदनगरचाच असल्‍याची माहिती आहे. केजरीवाल यांनी अण्‍णांना फसविल्‍याचा आरोप त्‍याने केला. पत्रकार परिषदेत प्रशांत भूषण बोलत असतानाच त्‍याने अचानक अण्‍णा हजारेंचे नाव घेत गोंधळ घातला.

यासंदर्भात अरविंद केजरीवाल यांनी पत्रकार परिषदेत स्‍पष्‍टीकरण दिले. अण्‍णा हजारेंनी एक पत्र पाठवून काही गोष्‍टी विचारल्‍या होत्‍या. 'इंडिया अगेंस्‍ट करप्‍शन' या संस्‍थेला भ्रष्‍टाचाराविरुद्ध आंदोलन आणि जनलोकपाल विधेयकाच्‍या लढ्यासाठी निधी मिळाला होता. त्‍याचा वापर निवडणुकीत तर करण्‍यात येत नाही ना, असा प्रश्‍न अण्‍णांनी केजरीवाल यांना विचारला होता. मी अण्‍णांना पत्राद्वारे उत्तर दिले असून आम्‍ही प्रत्‍येक पैशाचा हिशोब दिला आहे, असे केजरीवाल म्‍हणाले.