आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Rucus In Parliament Over Conversion Agra Police Arrested Nand Kishore Valmiki

धर्मांतराच्या मुद्यावरुन संसदेत गदारोळ, आग्रा येथे मुस्लिमांना हिंदू करणार्‍या आरोपीला अटक

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - धर्मांतराच्या मुद्यावरुन मंगळवारी संसदेत गदारोळ झाला. तर, दुसरीकडे आग्रा पोलिसांनी नंदकिशोर वाल्मिकी याला अटक केली आहे. आग्रा येथे झालेल्या हिंदू धर्मांतरातील वाल्मिकी हा मुख्य आरोपी आहे. आग्रा येथील काही मुस्लिम कुटुंबियांचे बळजबरीने हिंदू धर्मांतर केल्याचा त्याच्यावर आरोप आहे. पोलिसांनी त्यांच्यावर 12 हजारांचे बक्षीस ठेवले होते. थोड्याच वेळात पोलिस त्याच्या अटकेची माहिती पत्रकार परिषदेत देणार आहेत. दरम्यान, विश्व हिंदू परिषदेने (विहिप) उत्तर प्रदेशातील अलिगड येथे 25 डिसेंबर रोजी आयोजित केलेला धर्मांतर कार्यक्रम तुर्तास स्थगित केला आहे.
धर्मांतराच्या मुद्यावर राज्यसभा ठप्प
संसदेच्या कामकाजाला आज सुरुवात झाल्यानंतर धर्मांतराच्या मुद्यामुळे अनेकदा कामकाज स्थगित करण्यात आले. विरोधी पक्षाची मागणी होती, की यामुद्यावर पंतप्रधानांनी निवेदन केले पाहिजे. विरोधीपक्षाच्या भूमिकेमुळे सभापती हमीद अन्सारी नाराज झालेले दिसले. त्यांनी विरोधी पक्षाच्या सदस्यांना फटकारले. ते म्हणाले, 'जनतेने तुम्हाला येथे घोषणाबाजी करण्यासाठी पाठवलेले नाही. सभागृहात असा व्यवहार चालू दिला जाणार नाही.'
विरोधकांच्या गदारोळातच तृणमूल काँग्रेसचे खासदार सौगत रॉय म्हणाले, मोदी सरकार देशाच्या संघरचनात्मक ढाचावर प्रहार करत आहे.