आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रुडी, उमा भारतींसह 6 केंद्रीय मंत्र्यांचे राजीनामे; विनय सहस्रबुद्धे, अनिल देसाईंना संधी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- केंद्रीय मंत्रिमंडळ विस्ताराच्या पार्श्वभूमीवर सहा वरिष्ठ मंत्र्यांनी गुरुवारी राजीनामे सादर केले. यात उमा भारती, कलराज मिश्र, राजीव प्रताप रुडी, संजीव बाल्यान, महेंद्रनाथ पांडेय अाणि निर्मला सीतारामण यांचा समावेश अाहे. भाजप अध्यक्ष अमित शहा यांच्याशी चर्चेनंतर त्यांनी हे पाऊल उचलले. रात्री उशिरा भाजप अध्यक्ष अमित शहांच्या उपस्थितीत भाजपचे महासचिव रामलाल यांच्याकडे राजीनामे साेपवण्यात अाले. अाणखी काही मंत्री राजीनामे देण्याची शक्यता अाहे. दरम्यान, मंत्रिमंडळ विस्तार नेमका कधी हाेणार हे मात्र अजून स्पष्ट झालेले नाही. पंतप्रधान माेदी चीन दाैऱ्यावर जाण्यापूर्वी रविवारपर्यंत मंत्रिमंडळ विस्तार हाेऊ शकतो.

सूत्रांच्या माहितीनुसार, मंत्रिमंडळ विस्तारात माेदी- शहा नव्या सामाजिक समीकरणांवर भर देतील. अाेबीसीच्या मुद्द्यांवर सलग निर्णय घेणारे माेदी सरकार अाता काही उपेक्षित जातींना मंत्रिमंडळात स्थान देऊ शकते. अमित शहा यांनी खासदारांच्या यादीवर तीन दिवस मंथन केले. माेदींसाेबत चर्चाही केली. गुरुवारी रात्रीच्या बैठकीतही दाेघांनी संभाव्य मंत्र्यांच्या नावावर चर्चा केली. सध्या संरक्षण मंत्रिपदाचा कार्यभार असलेले अरुण जेटली यांनी यापूर्वीच अापल्याकडे जास्त दिवस हे खाते असणार नसल्याचे स्पष्ट केले अाहे.

गाेयल, प्रधान यांना पदाेन्नती
पीयूष गाेयल, धर्मेंद्र प्रधान याांना पदाेन्नती देऊन कॅबिनेट मंत्रिपद मिळू शकते. हे नेते अापली कामे राज्यमंत्र्यांकडे साेपवून पक्षात सक्रिय हाेऊ शकतात. जेटलींकडील संरक्षण मंत्रिपद साेडतील. अासामचे मंत्री हेमंत बिस्वा सरमा यांना संरक्षण राज्यमंत्री केले जाऊ शकते. शिवसेनेच्या अनिल देसाईंनाही मंत्रिपदाची संधी मिळू शकते.

रेल्वेसह परिवहन गडकरींकडे न दिले तरच सुरेश प्रभू कायम
स्मृती इराणींकडील वस्त्राेद्याेग काढून माहिती- प्रसारण खाते दिले जाईल. विनय सहस्रबुद्धे यांना पर्यावरण खात्याची जबाबदारी मिळू शकते. सुरेश प्रभू, राधामाेहन सिंह, राजीव प्रताप रुडींकडील जबाबदारीही बदलू शकते. चीनच्या धर्तीवर रेल्वेसह सर्व परिवहन विभाग एकत्र करण्याचे सादरीकरण नितीन गडकरींनी माेदींकडे केले अाहे. त्याला मंजुरी मिळाली नाही तर प्रभू रेल्वे मंत्रिपदी कायम राहतील.
बातम्या आणखी आहेत...