आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Rules In Railways Changed For Availing Senior Citizen Concession & Quota

रेल्वेने बदलले ज्येष्ठांच्या सवलतींचे नियम, जाणून घ्या नवीन नियम

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
तिकिट रद्द करण्याच्या आणि लहान मुलांच्या तिकिटांच्या नियमात बदल केल्यानंतर रेल्वे खात्याने आता ज्येष्ठ नागरिकांचा कोटा आणि कन्सेशनच्या नियमांत बदल केले आहेत. विशेष म्हणजे या नियमांतर्गत जर ज्येष्ठ नागरिकांना दिल्या जाणाऱ्या कन्सेशनचा गैरवापर करताना आढळल्यास संबंधितांना दंड आकारण्यात येणार आहेत.
1 फेब्रुवारी 2016 पासून हा नियम अंमलात येणार आहे. अशाप्रकारे गैरवापर करणाऱ्याला सूट मिळाल्यानंतरची तिकिटाची रक्कम आणि मूळ रक्कम यातील फरकाबरोबरच ठरावीक दंडही भरावा लागेल.

इतर सेवांप्रमाणेच भारतीय रेल्वेमध्येही ज्येष्ठांना तिकिटामध्ये सवलत, आरक्षण अशा अतिरिक्त सुविधा दिल्या जातात. 60 वर्षांपेक्षा अधिक वय असणारे पुरुष आणि 58 पेक्षा अदिक वय असणाऱ्या महिला यांना या सवलती दिल्या जातात. त्यांना सर्व रेल्वेंमध्ये सर्व दर्जाच्या तिकिटावर सवलती मिळतात. या सवलतीचे प्रमाण पुरुषांसाठी भाड्याच्या 40% आणि महिलांना 50% एवढे आहे.
पुढील स्लाइड्सवर वाचा, ज्येष्ठांना रेल्वेतर्फे दिल्या जाणाऱ्या सुविधा तसेच जुने आणि नवे नियम...