आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Rupa Ganguly May Head BJP’S Mahila Morcha In Bengal

बंगालमध्ये BJP महिला मोर्चाची जबाबदारी मिळणार टीव्हीवरील महाभारतातील 'द्रौपदी'ला

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - पश्चिम बंगालमध्ये पुढील वर्षी विधानसभा निवडणूक होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्ष एका प्रसिद्ध चेहऱ्याच्या शोधात आहे. शक्यता आहे की भाजपची शोध मोहिम रुपा गांगुलीजवळ येऊन थांबली आहे. त्यांना पक्षाच्या पश्चिम बंगाल महिला मोर्चाच्या अध्यक्षपदाची जबाबदारी देण्याची चर्चा आहे.

रुपा यांच्या नावाची घोषणा याच आठवड्यात होऊ शकते. काही महिन्यांपूर्वीच त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. छोट्या पडद्यावरील 'द्रौपदी'च्या भूमिकेमुळे देश रुपा गांगुली यांना ओळखतो.

निवडणुकीची तयारी
- एका इंग्रजी दैनिकातील वृत्तानुसार, भाजप पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत पूर्ण ताकदीने उतरण्याच्या तयारीत आहे. त्यासाठी त्यांनी रुपा गांगुली यांना महिला मोर्चाच्या अध्यक्ष करण्याचा विचार केला आहे.
- पश्चिम बंगालमध्ये बहुमताने विजयी झालेल्या तृणमूल काँग्रेस आणि विरोधीपक्ष डाव्या आघाडीकडे लोकप्रिय चेहरे आहेत. मात्र येथे भाजप अजूनही हिंदी भाषिक पक्ष म्हणून ओळखला जातो.
- येथे भाजपचा लोकप्रिय चेहरा म्हणजे खासदार बाबुल सुप्रियो. गायक असलेले सुप्रियो पॉप्युलर चेहरा आहे मात्र त्यांना पुढे केले तर विरोधकांना अधिक फायदा होण्याची शक्यता आहे.

राहुल सिन्हा होणार पायउतार
सूत्रांच्या माहितीनूसार, भाजप प्रदेशाध्यक्ष राहुल सिन्हा यांचा कार्यकाळ या वर्षी संपत आहे. सिन्हांच्या जागेवर नव्या चेहऱ्याची घोषणा 30 नोव्हेंबर रोजीच होणे आपेक्षित होते, मात्र दोन कारणांमुळे ते झाले नाही. पहिले - सिन्हा सध्या राज्यात कायदा आणि सुव्यवस्थेच्या बिघडलेल्या परिस्थितीविरोधात आंदोलन करत आहेत. दुसरे - त्यांच्याच नेतृत्वात भाजप राज्यात 7 ते 14 डिसेंबर दरम्यान जेलभरो आंदोलन करणार आहे.

पश्चिम बंगाल प्रदेशाध्यक्षपदासाठी भाजपमध्ये तीन नावांवर चर्चा सुरु असल्याचे सूत्रांनी सांगितले आहे. आता भाजपाध्यक्ष अमित शहा, राज्य प्रभारी कैलाश विजयवर्गीय आणि सह-प्रभारी सिद्धार्थनाथ सिंह हे निर्णय घेणार आहेत.

कोणती आहेत तीन नावे
- दिलिप घोष - आरएसएसची पार्श्वभूमी आहे. सध्या ऑफिसचे काम पाहातात.
- देवश्री चौधरी - पक्षाने जर एखाद्या महिलेकडे राज्याचे नेतृत्व देण्याचा विचार केला तर देवश्री चौधरी यांचे नाव सर्वात वरती आहे.
- सुभाष सरकार - भाजप राज्य कार्यालयाचे काम पाहातात.