आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
नवी दिल्ली - यूपीए सत्तेवर आली तेव्हा डॉलरच्या तुलनेत रुपयाचे मूल्य राहुल गांधी (वय 43 ) यांच्या वयाएवढे होते. आता ते सोनिया गांधी (वय 67 ) यांच्या वयाच्या जवळ गेले आहे. परिस्थिती अशीच राहिल्यास तो मनमोहनसिंगांच्या (वय 81) वयापर्यंत पोहोचेल, अशी मार्मिक टीका भाजपने केली आहे.
डॉलरच्या तुलनेत रुपयाच्या घसरणीवर प्रतिक्रिया देताना पक्षाचे राज्यसभेतील उपनेते रविशंकर प्रसाद म्हणाले, मे ते जुलै या काळात रुपया 53 वरून घसरून 60.15 पैशांपर्यंत आला आहे. यूपीएच्या चुकीच्या आर्थिक धोरणांमुळे ही घसरण झाली आहे. अर्थव्यवस्थेचे गाडे घसरताच परदेशी पैसा वेगाने बाहेरही जातो.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.