आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

रशिया, सिरियाच्या विमानांचे अलेप्पोवर हल्ले; ७ जण ठार

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बैरूत - रशिया आणि सिरियाच्या लढाऊ विमानांनी गुरुवारी अलेप्पो शहरावर गुरुवारी पुन्हा हल्ले केले. त्यात ७ नागरिक ठार झाले. युद्धबंदीसाठी अमेरिका आणि रशिया यांच्यात शेवटची बोलणी सुरू होणार असतानाच हे हल्ले करण्यात आले.
बंडखोरांच्या ताब्यात गेलेले अलेप्पो शहर ताब्यात घेण्यासाठी सिरियाच्या सरकारी फौजांनी कारवाई सुरू केली आहे. त्यांना रशिया आणि सिरियाच्या हवाई दलाचे पाठबळ मिळत आहे. त्यांनी गुरुवारी पहाटे केलेल्या २० हल्ल्यांत ७ नागरिक ठार झाले, अशी माहिती मानवी हक्क निगराणी गटाने दिली. सिरियन लष्कराने अलेप्पो शहराच्या ईशान्य भागातील टेकड्यांवर ताबा मिळवला आहे. बंडखोरांनी एका शाळेवर केलेल्या हल्ल्यात चार मुले ठार झाली.
(प्रतिकात्मक फोटो )
बातम्या आणखी आहेत...