आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Russian President Putin Say 40 Countries Help To Isis

दहशतवादी आयएसला ४० देशांतून होतोय अर्थपुरवठा, पुतीन यांचा खळबळ जनक दावा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- सिरिया, इराकसह जगभर उच्छाद मांडलेल्या इस्लामिक स्टेट (आयएस) या दहशतवादी संघटनेला जगभरातील ४० देशांतून पैसा पुरवला जात असल्याचा गंभीर दावा रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी केला. यात जी-२०च्या काही सदस्य देशांचाही समावेश असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

आयएसविरुद्ध सिरियामध्ये रशियानेही कारवाई सुरू केलेली आहे. विशेषत: रशियन विमान इजिप्तमध्ये पाडण्यात आल्यानंतर या रशियाने ही कारवाई अधिक उग्र केली आहे. मात्र, या कारवाईवर काही पाश्चिमात्य राष्ट्रांतून टीका होत आहे. सिरियामध्ये सत्ताधारी गटाच्या समर्थनार्थ रशियाने विरोधकांवरच हे हल्ले सुरू केले असल्याचे काही देशांचे म्हणणे आहे. या पार्श्वभूमीवर पुतीन यांनी केलेल्या आरोपाला विशेष महत्त्व प्राप्त झाले अाहे.