(छायाचित्र- परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी रशिया आणि भारत यांच्यातील करारातील कागदपत्रे रशियाचे राष्ट्राध्यक्ष ब्लादिमीर पुतीन यांना प्रदान करताना. पाठीमागे पंतप्रधान नरेंद्र मोदी दिसत आहेत)
नवी दिल्ली- रशियाचे राष्ट्राध्यक्ष ब्लादिमीर पुतीन आज भारताच्या एक दिवसीय दौ-यावर आले आहेत. भारतात दाखल होताच पुतीन यांनी
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. यानंतर दोन्ही देशांच्या प्रतिनिधींची एक प्राथमिक बैठक होईल. त्यानंतर भारत आणि रशिया यांच्यातील 15 वी वार्षिक शिखर बैठक झाली. यावेळी दोन्ही देशांदरम्यान, संरक्षण, अणुऊर्जा, तसेच हायड्रोकार्बन आदी क्षेत्रात करार झाले. भारत आणि रशिया यांच्यात तेल व गॅस शोधासाठी संयुक्त मोहिम राबविण्याचा करार झाला. तामिळनाडूतील कुडनकुलमसारखा देशात आणखी एक अणुप्रकल्प उभारण्याबाबत दोन्हा देशांत सामंजस्य झाले. पेट्रोल-गॅस, लष्कर प्रशिक्षण देवान-घेवाण, अणुऊर्जा, आरोग्य क्षेत्रात संशोधन आदींसह विविध 16 करारावर स्वाक्षरी करण्यात केल्या. अणु ऊर्जा ही शांततेसाठी वापरण्याबाबत दोन्ही देशाचे एकमत झाले. याचबरोबर पुढील 10 वर्षांसाठी आर्थिक, राजकीय आणि संरक्षणविषयक कराराचा आराखडा बनविण्याचा दोन्ही देशानी निर्णय घेतला.
रशियन भाषेत ट्विट करीत मोदींनी केले पुतीन यांचे स्वागत- पुतिन भारत दौ-यावर आल्याने पंतप्रधान मोदींनी आनंद व्यक्त केला आहे. मोदींनी रशियन भाषेत टि्वट करीत पुतीन यांचे स्वागत केले आहे. मोदींनी टि्वटवर याबाबत भावना व्यक्त करताना म्हटले आहे की, राष्ट्राध्यक्ष पुतिन यांचे भारतात स्वागत करताना मला आनंद होत आहे. काळ बदलला आहे पण मैत्रीत कोणतेही बदल झालेला नाही.
अमेरिकेशी जवळिक साधल्याने रशिया नाराज- पुतिन बुधवारी रात्री भारतात दाखल झाले. त्यांचा भारतातील संपूर्ण दौ-याचे वेळापत्रक पाहिल्यास ते भारतात 22 तास असतील. पुतिन यांचा दौरा हा उत्साहवर्धक नक्कीच असणार नाही जितका यापूर्वीच्या राष्ट्राध्यक्षांचा राहिला असेल. याचे कारण आहे भारत आणि अमेरिका यांच्यात वाढत चाललेली जवळिक.
राष्ट्राध्यक्ष बराक ओबामांना भारताने येत्या 26 जानेवारी दिवशी प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्याला प्रमुख पाहुणे निमंत्रित केल्याने आणि फ्रान्समधील रफेल कंपनीशी लढावू विमानाबाबत करार केल्याने रशिया भारतावर नाराज आहे. पुतिन यांचा दोन दिवसाचा नियोजित दौरा होता मात्र तो आता एक दिवसाचाच आहे.
20 बडे करार होणार - पुतिन यांच्यासमवेत 15 बिजनेस टायकून आले आहेत. ते भारतातील व्यावसायिक संधी याबाबत चर्चा करतील. याशिवाय भारत मिनी ब्रह्मोसबाबत बातचीत करेल. डायमंड इंडस्ट्री आणि ती विकसित करण्याबाबत दोन्ही देशांत एमआययू होऊ शकतो. रशियन तंत्रज्ञानावर आधारित स्मार्ट सिटी बनविण्याबाबच विचारविनिमय होऊ शकते. एकून 20 बडे करार होण्याची शक्यता आहे.
अणुऊर्जा- दोन्ही देशांदरम्यान यापूर्वीच 14-16 न्यूक्लियर प्लांटसाठी सहमती झाली आहे. ही संख्या 24 वर नेण्याचा प्रयत्न राहील.
हायड्रोकार्बन - रशिया भारताला एलएनजी विकू इच्छित आहे. आर्कटिकमध्ये गॅसच्या शोधासाठी ओएनजीसीला सामील करण्यास रशिया इच्छुक आहे. रशिया सगळ्यात मोठा तेल उत्पादक देश आहे. त्यांच्याकडे नैसर्गिक गॅसचाही मोठा साठा आहे.
एयरक्राफ्ट - रशियन बनावटीचे सुखोई सुपरजेट-100 आणि एमएस-21 प्रवासी विमान विकण्याकरिता प्रस्ताव सादर करू शकतो. हेलिकॉप्टर तयार करण्यासाठीही मदत करण्याची तयारी...
रशियालाही गरज
- पुतिन यांना भारतसोबत दोस्ती मजबूत करण्याची गरज आहे. यूक्रेन प्रकरणामुळे पश्चिमी देशांनी निर्बंध घातल्याने रशियन अर्थव्यवस्था डबघाईला आली आहे.
- रशियावर निर्बंध घातल्यानंतर भारतातून खाद्य पदार्थांची निर्यात वाढली आहे.
- आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाची किमतीत जबरदस्त घसरण झाल्याने रशियन अर्थव्यवस्था कोलमडली आहे.
- रशियन चलन रूबल आताच्या क्षणी खूपच कमजोर आहे. त्यामुळे रशियाचा असा प्रयत्न राहील की भारत लष्कर, आंतराळ तंत्रज्ञान आणि व्यापार याबाबत अधिक सहयोग मागावा.
पुढील स्लाईडवर बघा, पुतीन यांच्या दौऱ्याची छायाचित्रे....