आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Russia\'s Recent Arms Sales To Pakistan Alarms India

पाक-रशिया वाढत्या जवळीकीवर पर्रिकरांनी व्यक्त केली चिंता

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - नुकतेच रशियाच्या दौऱ्यावर गेलेले संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर यांनी तिथे पाकिस्तान आणि रशियाच्या वाढत्या संबंधाबद्दल चिंता व्यक्त केली. रशिया आणि पाकिस्तानमध्ये काही दिवसांपूर्वीच शस्त्रास्त्र खरेदी झाली होती. यावर भाष्य करताना पर्रिकरांनी भविष्यात दोन्ही देशांच्या लष्कराच्या वाढत्या सहकार्यावर चिंता व्यक्त केली. या वर्षाच्या एप्रिलमध्ये पाकिस्तानचे संरक्षणमंत्री रशियात गेले होते. त्यानंतर प्रकाशित झालेल्या वृत्तानूसार दोन्ही देशांचे लष्कर संयुक्त अभ्यास करण्याची शक्यता वर्तवण्यात आली होती. भारताने या सर्व प्रकरणावर रशियाकडून स्पष्टिकरणाची मागणी केली आहे.
काय आहे प्रकरण
> पर्रिकरांनी रशियाचे संरक्षण मंत्री सर्गेई शोगू यांची भेट घेतली. या भेटीत त्यांनी भारत आणि रशिया यांच्यातील संयुक्त मिलिटरी प्रोजेक्ट्सवर चर्चा केली. त्यात मीडियम ट्रान्सपोर्ट एअरक्राफ्ट आणि फिफ्थ जनरेशन फायटर प्रोग्रामवर चर्चा झाली. त्याशिवाय, रशिया आणि पाकिस्तानच्या वाढत्या संबंधावर त्यांनी चिंता व्यक्त केली.

> काही दिवसांपूर्वीच समोर आलेल्या माहितीनूसार, रशियाने त्यांचे अत्याधुनिक शस्त्र आणि हेलिकॉप्टर्स पाकिस्तानला ऑफर केले आहेत. पाकिस्तानने त्यांच्याकडून चार Mi-35 अॅटॅक हेलिकॉप्टर्स खरेदी केले होते. याने त्यांच्या सामरिक शक्तीत फार काही फरक पडणार नाही, असे भारतीय तज्ज्ञ मानतात. मात्र, या व्यवहाराचा दुसरा अर्थ असा आहे, की रशियाने पाकिस्तानला अशा प्रकारची मदत प्रथमच केली. त्यामुळे भारताची चिंता वाढली आहे.

> पाकिस्तान Su-35 एअरक्राफ्ट खरेदीची रशियासोबत चर्चा करत असल्याचीही माहिती आहे. त्यामुळे भारताचे टेंशन वाढले आहे. सूत्रांच्या माहितीनूसार, फायटर जेट हे Su-30 पेक्षा जास्त शक्तीशाली आहेत. मात्र रशियाने याला नकार दिला आहे. त्यांनी कोणताही शस्त्रास्त्र खरेदी करार झाला नसल्याचे म्हटले आहे.
भारत खेरदी करणार अँटी-बॅलिस्टिक क्षेपणास्त्र यंत्रणा
भारत रशियाकडून जगातील सर्वात अत्याधुनिक अँटी-बॅलिस्टिक क्षेपणास्त्र यंत्रणा खेरदी करणार आहे. अशी माहिती आहे, की पर्रिकरांनी हा करार पूर्ण केला असून याची आता औपचारिक घोषणा होणे बाकी आहे.
चीन-पाकला सडेतोड उत्तर
भारत रशियासोबत 70 हजार कोटींचा करार करत आहे. अशी माहिती आहे की भारताने रशियाकडून अँटी-बॅलिस्टिक क्षेपणास्त्र यंत्रणा खेरदी केल्यानंतर भारत चीन आणि पाकिस्तानकडून होणाऱ्या कोणत्याही क्षेपणास्त्राच्या हल्ल्याला सडेतोड उत्तर देऊ शकेल. भारत अशा 10-12 यंत्रणा खेरदी करणार आहे.