आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

‘सार्क’च्या प्रत्येक बाबीत पाकची अडवणूक खपवून घेणार नाही, भारताचा गर्भित इशारा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - ‘सार्क’च्या प्रत्येक मुद्द्याबाबत पाकिस्तान करत असलेली अडवणूक खपवून घेतली जाणार नाही. अडवणूक कायम राहिली तर दक्षिण आशिया विभागातील इतर देशांना ‘बिम्सटेक’सारखा दुसरा पर्याय निवडावा लागेल, असा इशारा भारताने सोमवारी दिला.
‘भारत आणि महाशक्ती : सातत्य आणि बदल’ या विषयावरील चर्चासत्रात सहभागी होताना भारताचे परराष्ट्र सचिव एस. जयशंकर यांनी पाकिस्तानचे नाव न घेता त्या देशाच्या सार्कबद्दलच्या दृष्टिकाेनावर टीका केली. ते म्हणाले की, सर्व देशांना एकत्रित करण्यात आणि संबंध वृद्धिंगत करण्यात भारताला रस आहे. विभागीय सहकार्यामुळे आशियासह सर्वांनाच फायदा होईल. पाकिस्तानने काठमांडू येथे सार्कच्या गेल्या शिखर परिषदेत एका महत्त्वाच्या विभागीय संपर्क करारात अडथळा आणला होता. त्याचा उल्लेख करून जयशंकर म्हणाले की, विभागात घेतलेल्या प्रत्येक पुढाकाराच्या पावलाला अडथळा आणून चालणार नाही. एकीकडे आपण जबाबदार सदस्य आहोत असे म्हणायचे आणि दुसरीकडे खोडा घालायचा हे चालणार नाही. सार्कमधील अनेक देशांना विकास हवा आहे. पण अडवणूक सुरूच राहिली तर हे देश बिम्सटेकसारख्या संघटनेकडे वळतील.

तिसऱ्या देशाचा हस्तक्षेप नको
भारत आणि पाकिस्तान यांच्यातील प्रश्न सोडवण्यासाठी तिसऱ्या देशाच्या हस्तक्षेपाची काहीही गरज नाही. तुमच्याकडे अंपायर असेल तर खेळाचा नैसर्गिक समतोल बिघडतो, असा उल्लेख जयशंकर यांनी केला. चीन- पाकिस्तान संबंधांचा उल्लेख करताना ते म्हणाले की, या संबंधांतून तयार झालेल्या मुद्द्यांमुळे भारत चिंतित आहे. त्यात पाकव्याप्त काश्मीरमधून चीन बांधत असलेल्या आर्थिक कॉरिडॉरचाही समावेश आहे. या वेळी जयशंकर यांनी विविध जागतिक मुद्द्यांचा ऊहापोह केला.

पुढे वाचा, राहील शरीफ २९ ला निवृत्त होणार...
बातम्या आणखी आहेत...