आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sabir Ali Wife Yasmin Will Go On Dharna Mukhtar Abbas Naqvi

नकवींनी पुरावे दिले नाही तर त्यांच्या घरासमोर धरणे, साबीर अलींच्या पत्नीचा इशारा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - भारतीय जनता पक्षातून 24 तासांत हकालपट्टी करण्यात आलेले साबीर अली यांची पत्नी यास्मिन यांनी भाजप उपाध्यक्ष मुख्तार अब्बास नकवी यांच्याविरोधात मोर्चा उघडला आहे. त्या म्हणाल्या, 'नकवींनी माझ्या पतीवर जे आरोप केले आहे, त्याचे त्यांनी पुरावे द्यावे नाही तर माफी मागावी.' यास्मिन यांनी, नकवींनी 24 तासांत माफी मागितली नाही तर, त्यांच्या घराबाहेर धरणे आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.
साबीर अलींनी देखील नकवींवर हल्लाबोल केला आहे. ते म्हणाले, 'नकवींनी केलेल्या आरोपांमुळे माझ्या कुटुंबाला धक्का बसला आहे. आज पर्यंत माझ्यावर असे आरोप कोणी केलेले नाहीत'