फोटो : हिंडन एअरबेसवर सोहळ्यात सहभागी कॅप्टन सचिन तेंडुलकर
नवी दिल्ली - भारतीय नौसेना बुधवारी 82 वा 'एअरफोर्स डे' साजरा करत आहे. हिंडन एअरफोर्स स्टेशनवर यानिमित्ताने आयोजित सोहळा पाहण्यासाठी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरने इंडियन एअरफोर्सचा अधिकारी म्हणून कार्यक्रमात सहभाग घेतला. चार वर्षांपूर्वी एअरफोर्सने सचिनला कॅप्टन पद बहाल करून गौरवले होते. एअरफोर्सशी संबंध नसताना हा सन्मान मिळवणारा सचिन हा पहिला व्यक्ती आहे. कार्यक्रमात सचिन गणवेशात पत्नी अंजलीसह सहभागी झाला होता. लष्करप्रमुख दलबीर सिंह हेही यावेळी उपस्थित होते.
या सोहळ्यात नौदलाच्या विमानांनी अनेत थरारक कवायतींचे सादरीकरण करत उपस्थितांची मने जिंकली. आकाशगंगा टीमने AN-32 विमानांच्या मदतीने हवेत कलाकाली दाखवली. त्याशिवाय Mi-17 V5 हेलिकॉप्टर, Mi-25/35, An-32, C-130J हर्क्युलस यांचेही सादरीकरण झाले.
पुढे पाहा, सोहळ्याचे काही PHOTO