आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर फेसबुकवरही ‘विक्रमाचा बादशहा’

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- भारताचा सलामीचा फलंदाज व मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने मैदानात 'विक्रमाचा बादशहा' असल्याचे सिद्ध केल्यानंतर आता तो ‘फेसबुक’ सोशल नेटवर्किंग वेबसाईटवरही आपणच ‘बादशहा’ असल्याचे सिद्ध केले आहे. सचिनला ‘फेसबुक’वर एक कोटींपेक्षा जास्त लोकांनी सचिनला लाईक केले आहे. भारतीय संगीतकार ए. आर. रेहमाननंतर आता सचिनच्या पेजला सर्वाधिक लोकांनी लाईक केले आहे.

सध्या जगभर लोकप्रिय सोशल नेटवर्किंग साईट असलेल्या ‘फेसबुक’वर सचिनच्या चाहत्यांची संख्या 1 कोटी, 2 लाख 806 (आकड्यात 10, 020, 814) एवढी आहे. तर 83 लाख 8 हजार 750 ( आकड्यात 838,750) लोक सचिनविषयी चर्चा करतात. संगीतकार रहेमानला 1 कोटी 19 लाख 35 हजार 405 (आकड्यात 11, 935, 405) जणांनी ‘लाईक’ केले आहे तर 75, 218 लोक रेहमान व त्याच्या संगीताविषयी चर्चा करतात.

यंदाच्या आयपीएल हंगामाचे विजेतेपद ‘मुंबई इंडियन्स’ने जिंकले आहे. विजेतेपदासह संपूर्ण संघाचा फोटो सचिनने आपल्या पेजवर टाकला आहे. या फोटोला आतापर्यंत 1 लाख 76 हजार 047 जणांनी लाईक केले तर, आयपीएल विजेतेपदाची ट्रॉफी उचलेल्या सचिनच्या फोटोला 3 लाख 93 हजार 510 लोकांनी ‘पसंत’ म्हटले आहे.

रेहमान व सचिननंतर ‘फेसबुक’वर लोकप्रिय व्यक्तींमध्ये तिसरा क्रमांक ‘दबंग’ सलमान खानचा लागतो. सलमानला आतापर्यंत 83 लाख 84 हजार 329 चाहत्यांनी लाईक केले आहे. ‘मिस्टर पर्फेक्शनिस्ट’ आमीर खान चौथ्या क्रमांकावर आहे. त्याला 70 लाखाहून अधिक चाहते फेसबुकवर पसंत करतात. ‘ट्विटर’वर सर्वाधिक फॉलोअर्स असलेल्या बिग बी अमिताभ बच्चन मात्र ‘फेसबुक’वर बरेच मागे आहेत. कारण त्यांनी गेल्या काही महिन्यातच फेसबुक ज्वाईन केले होते. तरीही बच्चन यांच्या पेजला 45 लाखाहून अधिक लोकांनी ‘लाईक’ केले आहे.