आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कबीर कला मंचचे शाहीर सचिन माळी यांच्यासह तिघांना सुप्रिम कोर्टातून जामीन मंजूर

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - नक्षलवादी चळवळशी संबंध असल्याच्या आरोपावरुन देशद्रोहाच्या खटल्यात तुरुंगात असलेले कबीर कला मंच या सांस्कृतिक कला पथकातील शाहीर सचिन माळी यांना मंगळवारी सुप्रीम कोर्टाने जामीन मंजूर केला आहे. सचिन यांच्यासह सागर गोरखे, रमेश गायचोर यांनाही जामीन मंजूर झाला आहे. सचिन माळी यांची पत्नी शीतल साठे यांना याआधीच जामीन मिळाले आहे. 
 
दहशतवाद विरोधी पथकाने नक्षलवादी चळवळीशी संबंधीत काहींना 2011 मध्ये ठाणे आणि पुण्यातून अटक केली होती. त्यानंतर कबीर कला मंचचे नाव नक्षलवादी चळवळीसोबत जोडले गेले होते. फुले-शाहू-आंबेडकरांचा विचार आपल्या गाण्यातून पोहोचवणाऱ्या सचिन माळी आणि शीतल साठे यांच्यामागे तेव्हापासून पोलिस लागले होते. काही दिवस दोघेही भूमिगत होते. त्यानंतर सचिन आणि शीतल यांनी मुंबईत मंत्रालयासमोर आत्मसमर्पण केले होते. 
 
सरेंडर नाही सत्याग्रह 
शीतल आणि सचिन यांनी विधानभवनासमोर आत्मसमर्पण केले होते, त्याला त्यांनी सरेंडर न म्हणता सत्याग्रह म्हटले होते. आपली नेमकी बाजू मांडण्याची संधी मिळावी यासाठीचा हा सत्यग्रह असल्याचे या दाम्पत्याने म्हटले होते. यावेळी भारिप बहुजन महासंघाचे नेते प्रकाश आंबेडकर, डाव्या चळवळीतील डॉ. भालचंद्र कांगो यांच्यासह अनेक नेते उपस्थित होते. 
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.) 
बातम्या आणखी आहेत...