आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sachin Tendulkar And Eminent Scientist Prof C N R Rao Conferred Bharat Ratna By President.

मास्टर ब्लास्टर झाला \'भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर\', मुलगा अर्जुन अनुपस्थित

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - प्रसिद्ध क्रिकेट खेळाडू सचिन तेंडुलकर आणि ज्येष्ठ रसायनशास्त्रज्ञ प्रो. सी.एन.आर.राव यांना राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी भारतरत्नने सन्मानित केले आहे. राष्ट्रपती भवनात आयोजित या सोहळ्यासाठी पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग, यूपीएच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांच्यासह अनेक मंत्री उपस्थित होते.
भारतरत्न या सर्वोच्च नागरी पुरस्काराने सन्मानित होणारा मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर हा पहिला खेळाडू असून या पुरस्काराने सन्मानित होणारा सर्वात तरुण भारतीय आहे. या सोहळ्यासाठी सचिनची पत्नी अंजली, मुलगी सारा उपस्थित आहेत. तर, राव यांच्या पत्नी आणि त्यांचा पुत्र देखील उपस्थित आहे.

सचिनचा मुलगा अर्जुन या सोहळ्याला उपस्थित नव्हता. त्याच्या गैरहजेरीचे कारण काही कळु शकलेले नाही.
जगातील साठ विद्यापीठांनी प्रो. राव यांना मानद डॉक्टरेटने सन्मानित केले आहे. सध्या ते पंतप्रधानांचे वैज्ञानिक सल्लागार आहेत. राव हे JNCASR चे मानद अध्यक्षही आहेत. त्यांचा जन्म 1935 मध्ये बंगळुरू येथे झाला. 1954 मध्ये त्यांनी BHU मधून मास्टर डिग्री मिळवली. जगभरातील 90 पेक्षा जास्त पुरस्कार मिळालेले राव मेटल ऑक्साइडच्या शोधानंतर प्रसिद्ध झाले. त्यांनी 1500 शोधपत्र तर 45 पुस्तके लिहिली आहेत.

पुरस्कार आईला अर्पण
भारतरत्न सचिन तेंडुलकरने देशाचा सर्वोच्च नागरी सन्मान आईला आणि देशातील तमाम मातांना अर्पण करीत असल्याचे म्हटले आहे. पुरस्कार मिळाल्यानंतर राष्ट्रपती भवनाबाहेर प्रतिक्रिया व्यक्त करताना सचिनने प्रो. सी.एन.आर. राव यांच्या कार्याचा गौरव करीत त्यांचे अभिनंदन केले.
पुढील स्‍लाइडवर वाचा, भारत सरकारने आतापर्यंत कोणकोणत्या खेळाडूंना सर्वोच्‍च पुरस्‍कार देऊन गौरविले आहे...