आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sachin Tendulkar Is No More Indian Airforce Brand Ambassador

सचिन आता वायुसेनेचा ब्रँड अँबेसिडर नाही, तरुणांना आकर्षित करण्‍यात ठरला अपयशी

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्‍ली- तरुणांना आकर्षित करण्‍यासाठी भारतीय वायुसेनेने मास्‍टर ब्‍लास्‍टर सचिन तेंडुलकरला ब्रँड अँबेसिडर बनविले होते. मात्र, सचिनकडून करण्‍यात आलेल्‍या अपेक्षांचा भंग झाला आहे. तरुणांना आकर्षित करण्‍यामध्‍ये सचिन अपयशी ठरला आहे. त्‍यामुळेच आता वायुसेनेच्‍या प्रचार मोहिमांमधून सचिनला हटविण्‍यात आले आहे. एवढेच नव्‍हे तर ब्रँड अँबेसिडर म्‍हणून त्‍याला दिलेली पदवीही वायुसेनेने काढून घेतली आहे.

सचिनला वायुसेनेने 2010 मध्‍ये ग्रुप कॅप्‍टनची मानद रँक दिली होती. सचिनपासून प्रेरणा घेत अनेक तरुण वायुसेनेत दाखल होतील, अशी अपेक्षा होती. परंतु, ती फोल ठरली. त्‍यामुळे तरुणांना पायलट बनण्‍यासाठी आकर्षित करण्‍याकरीता आता वायुसेनेने स्‍वतःचेच बेसिक ट्रेनर विमान 'पिलाटस'चा वापर सुरु केला आहे. अशी 14 विमाने भारतात आली असून हैदराबादमध्‍ये प्रशिक्षणासाठी त्‍याचा वापर सुरु करण्‍यात आला आहे. वायुसेनेच्‍या प्रचार शाखेतूनही ब्रँड अँबेसिडर म्‍हणून लावण्‍यात आलेली सचिनची छायाचित्रे आणि पोस्‍टर्स हटविण्‍यात आली आहे. त्‍यांची जागा या विमानांनी घेतली आहे.