आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सचिनला भारतरत्न

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - कोट्यवधी क्रिकेट चाहत्यांच्या गळ्यातला ताईत सचिन रमेश तेंडुलकर देशाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार ‘भारतरत्न’चा मानकरी ठरला आहे. रसायन शास्त्रज्ञ सी.एन.आर. राव यांना त्यांच्या क्षेत्रातील भरीव योगदानाबद्दल ‘भारतरत्न’ देण्याची घोषणा पंतप्रधान कार्यालयाने शनिवारी केली. सचिन तेंडुलकर आता ‘भारतरत्न’ असेल. सचिनला 26 जानेवारी रोजी या पुरस्काराने गौरवले जाईल. एखाद्या खेळाडूला हा पुरस्कार मिळवण्याची इतिहासातील पहिलीच वेळ आहे. इतकेच नव्हे, तर ‘भारतरत्न’ हा पुरस्कार मिळवणारा तो सर्वांत कमी वयाचा व्यक्ती आहे.
सचिनला हा सन्मान जाहीर करण्यासाठी शासनाने पुरस्काराच्या नियमांतही बदल केला होता. भारतरत्न क्रीडा क्षेत्रातील व्यक्तींना देण्याची तरतूद आधी नव्हती. पंतप्रधान मनमोहनसिंग यांनी दूरध्वनीवरून सचिनला शुभेच्छा दिल्या. सचिनने हा अवॉर्ड आईला समर्पित केला आहे.
पुरस्काराची घोषणा होताच सोशल मीडियावर सचिनसाठी शुभेच्छांचा वर्षाव सुरू झाला. लता मंगेशकर, अमिताभ बच्चन यांच्यासह क्रीडा, चित्रपट क्षेत्रातील अनेक दिग्गजांनी सचिनचे अभिनंदन केले. दुसरीकडे ‘मंगळ मिशन’मध्ये महत्त्वाची भूमिका पार पाडल्यामुळे राव यांना हा पुरस्कार जाहीर झाला.
सृष्टीतील सृजनशक्तीचा
मी आहे एक
खास उन्मेष
जो पूर्वी कधी घडला नव्हता
सृष्टीच्या प्रारंभापर्यंत
आणि पुन्हा घडणार नाही
सृष्टीच्या अंतापर्यंत
असा एक खास मी!
(वि. वा. शिरवाडकर यांच्या ‘आनंद’
नाटकातून)