आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sack Minister Giriraj Singh, PM Must Apologise, Says Congress

लोकसभा गदारोळानंतर गिरिराज सिंह यांच्याकडून माफी, भूसंपादनचा वटहुकूम सादर

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या दुसऱ्या सत्राला आज सुरुवात झाली. लोकसभाध्यक्ष सुमित्रा महाजन यांचे अध्यक्षीय भाषण संपल्याबरोबर विरोधीपक्षाच्या खासदारांनी केंद्रीय मंत्री गिरिराजसिंह यांच्या महिलांविषयीच्या वक्तव्याचा निषेध केला आणि यावर पंतप्रधानांच्या माफीची मागणी लावून धरली. या गदारोळामुळे दुपारी 12.30 पर्यंत दोन वेळा कामकाज स्थगित करण्यात आले. प्रथम 11.45 पर्यंत आणि नंतर दुपारी दोन वाजता पर्यंत कामकाज स्थगित करण्यात आले आहे. विरोधकांच्या गदारोळातच सरकारने भू-संपादन वटहुकूम सादर केला. त्याला प्रमुख विरोधीपक्ष काँग्रेसने विरोध करत सभात्याग केला.

सभागृहात उपस्थित असलेले संसदीय कामकाजमंत्री व्यंकय्या नायडू यांनी सरकार अशा वक्तव्यांचे समर्थन करत नाही. प्रत्येकवेळी पंतप्रधांनाच्या स्पष्टीकरणाची मागणी बरोबर नाही असे सांगितले. मात्र विरोधक शांत झाले नाही. त्यांनी जोरदार घोषणाबाजी सुरु केल्यानंतर सभागृहाचे कामकाज पावणेबारा वाजता पर्यंत स्थगित करण्यात आले. त्यानंतर परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांच्या येमेनवरील विधानाने कामकाजाला सुरुवात झाली. मात्र भू-संपादन अध्यादेश मागे घेण्याची विरोधकांकडून जोरदार घोषणाबाजी सुरु होती. या घोषणाबाजीत स्वराज यांचा आवाज दबला होता. त्या काय सांगत आहेत ते काहीच समजत नव्हते. शेवटी लोकसभाध्यक्ष महाजन यांनी दुपारी 2 पर्यंत कामकाज स्थगित केले.
अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या दुसऱ्या टप्प्यात रखडलेली अनेक विधेयके मार्गी लावण्याचा सरकारचा प्रयत्न होता. मात्र विरोधकांनी पहिल्या दिवशीच सरकारची कोंडी केली. भूसंपादन विधेयक, अवकाळी पाऊस, गारपिटीचा फटका बसलेल्या शेतक-यांच्या तक्रारी व नुकसान भरपाई, काश्मीर खो-यातील चिघळलेली परिस्थिती यामुळे अधिवेशन वादळी ठरण्याची चिन्हे होतीच. अधिवेशनाच्या एक दिवस आधी काँग्रेसने भूसंपादन विधेयकाविरोधात रामलीला मैदानावर सभा घेऊन आक्रमक पवित्रा स्वीकारला आहे. त्याचे पडसाद अधिवेशनात उमटलेले दिसले.
काँग्रेस खासदार ज्योतिरादित्य यांनी केली माफीची मागणी
काँग्रेस खासदार ज्योतिरादित्य सिंधिया यांनी काही दिवसांपूर्वी केंद्रीय मंत्री गिरिराजसिंह यांनी सोनिया गांधी यांच्यावर केलेल्या वर्णद्वेषी टिप्पणीवरुन पंतप्रधानांनी माफी मागण्याची मागणी केली. सिंधिया म्हणाले, पंतप्रधानांनी माफी मागावी आणि गिरिराज यांना मंत्रिमंडळातून काढावे. त्यांनतर सभागृहात गोंधळाला सुरुवात झाली. या गोंधळातच गिरिराज यांनी त्यांचे वक्तव्य वाचून दाखवले. ते म्हणाले, 'माझ्या वक्तव्याने जर कोणी दुखावले गेले असेल तर मी त्याबद्दल खेद व्यक्त करतो.' गिरिराज जेव्हा बोलत होते, तेव्हा काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी सभागृहातच होत्या.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी सकाळी संसदेत पोहोचले. कामकाजाला सुरुवात होण्यापूर्वी त्यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा पहिला टप्पा सकारात्मक राहिला, त्याबद्दल सर्व पक्षांना धन्यवाद दिले. त्यासोबतच दुसरा टप्पाही सकारात्मक कामकाजाचा राहील आशी आपेक्षा व्यक्त केली.
दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी 26 एप्रिल रोजी रेडिओवरील 'मन की बात' कार्यक्रमातून संवाद साधणार आहेत.
पुढील स्लाइडमध्ये वाचा, काय म्हणाले होते गिरिराजसिंह