आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sadhu Yadav Daughter Married To Grandson Of Mulayam In Delhi

लालूंच्या भाचीचा मुलायमसिंहाच्या नातवासोबत विवाह, आलेल्यांपेक्षा गैरहजर गेस्टची जास्त चर्चा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लग्न सोहळ्या दरम्यान राहुल आणि ईशा - Divya Marathi
लग्न सोहळ्या दरम्यान राहुल आणि ईशा
नवी दिल्ली - लालू यादवांचे मेहुणे साधू यादव यांच्या मुलीचे गुरुवारी मुलायमसिंह यादवांच्या नातवासोबत लग्न झाले. मुलायमसिंहाचे नातू राहुल आणि साधु यादवांची मुलगी ईशा कॉलेज फ्रेंड होते. त्यांचा लग्न सोहळा कॅनॉट प्लेस येथील हॉटेल इम्पॅरियल मध्ये सुरु आहे. ईशा-राहुलचा साखरपुडा 26 फेब्रुवारी रोजी दिल्लीतच झाला होता. या लग्नात आलेल्या गेस्ट पेक्षा न आलेल्या पाहुण्यांची चर्चा सर्वाधिक होती.

भाचीच्या लग्नाला का गेले नाही लालू यादव
- सर्वात आधी लग्नसोहळ्याला पोहोचणाऱ्यांमध्ये राजनाथसिंह होते.
- साधु यादव यांनी पाहुण्यांचे स्वागत केले. गुरुवारी सायंकाळी 7.30 वाजता पूजा झाली. त्यानंतर रात्री 8 वाजता वरात हॉटेलमध्ये पोहोचली.
- साधु यादवांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री अखिलेश यादव यांच्यासह वऱ्हाडींचे पुष्पहार घालून स्वागत केले.
- मुलायमसिंह यादव, त्यांचे बंधु रामगोपाल यादव, अखिलेश यादव यांच्यासह मुलायमसिंह यांच्या कुटुंबातील सर्व सदस्य सहभागी झाले होते.
- लग्नाला भाजपकडून पोहोचणारे पहिले नेते राजनाथसिंह ठरले. ते अखिलेश आणि रामगोपाल यादव यांच्यासोबत बसले होते.
लालू यादवांच्या कुटुंबातून कोणीच आले नसल्याची चर्चा
- साधू यादव हे लालू यादवांचे मेहुणे मात्र लालूंच्या कुटुंबातील या लग्नाला कोणीच उपस्थित नव्हते. त्याचीच लग्नात सर्वाधिक चर्चा होती.
- लालू यादव साधू यांचे भाऊजी असण्यासोबतच मुलायम यांचे व्याही देखिल आहेत.
- साधू यादव यांनी 2009 च्या लोकसभा निवडणुकीमध्ये लालूंच्या आरजेडीकडून तिकीट न मिळाल्याने काँग्रेसचा 'हात' पकडला होता.
- काँग्रेसने त्यांना उमेदवारी दिली मात्र ते विजयी होऊ शकले नाही.
- त्यानंतर लालू आणि साधू यादव यांच्यातील नात्यात दरी निर्माण झाली.
- 2015 मध्ये बिहार विधानसभा निवडणुकीत साधू यादव यांनी लालूंचे विरोधक पप्पू यादव यांच्या पक्षात प्रवेश केला होता.
पुढील स्लाइडमध्ये पाहा, कोण-कोण आले राहुल ईशाच्या लग्नाला