आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sadhvi Niranjan Jyoti Addresses A Rally In Trilokpuri Delhi

दंगल प्रभावित भागात साध्वी ज्योतींची सभा, म्हणाल्या - हाती सुदर्शनचक्र घ्यावे लागेल

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - काही दिवसांपूर्वीच एका प्रचारसभेत विरोधी पक्षावर निशाणा साधताना अपशब्दांचा वापर करणार्‍या भाजप नेत्या आणि केंद्रीय राज्यमंत्री साध्वी निरंजन ज्योती यांची दंगल प्रभावित त्रिलोकपूरी भागात सोमवारी सभा झाली. यावेळी साध्वी निरंजन ज्योती यांनी काही महिन्यांपूर्वीच येथे भडकलेल्या दंगलीचा उल्लेख केला नाही, मात्र त्यांनी मतदारांना कृष्णासारखेच हातात चक्र घ्या, असा सल्ला दिला.
निरंजन ज्योती यांच्या दिल्लीतील एका सभेतील भाषणावरुन गेल्या आठवड्यात काँग्रेस आणि इतर विरोधीपक्षांनी राण उठवले होते. त्यांनी काँग्रेसला 'हरामजादे' म्हटले होते. त्यांनी माफी मागितल्यानंतरही यावरुन संसदेपासून रस्त्यापर्यंत आंदोलन सुरु होते. लोकसभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी निवदेन करुन आणि राज्यसभेत सभापतींनी मध्यस्थी केल्यानंतर हे प्रकरण कसेतरी शांत झाले होते.
काय म्हणाल्य साध्वी
त्रिलोकपूरी येथील सभेत ज्योती यांनी 'मेरे अलबेले राम' हे भजन गायले. मतदारांना आवाहन करताना त्या म्हणाल्या,' हे भजन संपूर्ण दिल्लीत गायले गेले पाहिजे. भगवान श्यामसुंदराच्या सुदर्शन चक्रासमोर जो येईल तो वाचणे शक्य नाही. तुम्ही देखील उठा, श्रीकृष्णासारखा रणसंग्रमाचा शंख वाजवा. येथे शांततेने शांतता येणार नाही, तर तुम्हाला चक्र चालवावे लागेल.'
शेवटच्या क्षणाला बदलले सभास्थान
भारतीय जनता पक्षाने त्रिलोकपूरीच्या ब्लॉक 36 मध्ये सभेचे आयोजन केले होते. येथे पोलिसांनी सुरक्षेच्या कारणास्तव परवानगी नाकारली. त्यानंतर शेवटच्या क्षणी ब्लॉक 34 मध्ये सभा आयोजित केली गेली. साध्वी निरंजन ज्योती यांनी प्रचारसभेत काँग्रेस आणि आम आदमी पार्टी या दोन्ही पक्षांवर जोरदार निशाणा साधला. त्या म्हणाल्या सत्तेत येण्याआधी त्यांनी तुम्हाला विचारले. पण सत्ता सोडताना तुमचे मत लक्षात घेतले नाही. तर, काँग्रेसवर अप्रत्यक्ष हल्ला करताना त्या म्हणाल्या, 'भाजपच्या समर्थनार्थ 'हात' उंचावू नका. मला त्याची अॅलर्जी आहे. आमच्या समर्थनार्थ मूठ दाखवा.'