आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संसदेतही दहशतवादी, नावेदला हिंदू संघटनांकडे सोपवा, म्हणाल्या साध्वी प्राची

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- विश्व हिंदू परिषदेच्या वादग्रस्त नेत्या साध्वी प्राची यांनी पुन्हा एकदा बेताल वक्तव्याने खळबळ उडवून दिली आहे. संसदेत अजूनही एक-दोन दहशतवादी बसले आहेत, असे म्हणून त्यांनी नाव न घेता काही खासदारांवर खरमरीत टिका केली आहे.
साध्वी प्राची म्हणाल्या, की भारतीय संसदेतही एक-दोन दहशतवादी आहेत. हे देशाचे दुर्भाग्य आहे. यापेक्षा कोणतीही मोठी नुकसानदायी गोष्ट राहू शकत नाही. सर्वोच्च न्यायालयाचा निकालही त्यांना मंजुर नाही. न्यायालयाने त्याला (याकूबला) दहशतवादी घोषित केले आहे. तरीही त्याला समर्थन दिले जाते. न्यायालयाने एकद्याला दहशतवादी घोषित केल्यावरही त्याचे समर्थन केले जात असेल तर हे लोक स्वतः दहशतवादी आहेत.
प्राणांची बाजी लावून बीएसएफच्या जवानांनी नावेद नावाच्या दहशतवाद्याला जिवंत पकडले आहे. त्याला हिंदू संघटनांच्या स्वाधिन करा. आम्ही त्याला बरोबर धडा शिकवतो. उगाच चौकशी करण्याच्या भानगडीत पडू नये, असेही साध्वी प्राची म्हणाल्या आहेत.
साध्वी प्राची यांनी पहिल्यांदाच असे वादग्रस्त वक्तव्य केलेले नाही. यापूर्वीही त्यांनी अनेक वक्तव्ये करुन खळबळ उडवली आहे. पुढील स्लाईडवर क्लिक करुन वाचा ही वक्तव्ये...