आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sahara Case: Subrata Roy To Stay In Jail As Supreme Court Rejects Plea

सुब्रतो रॉय यांना दिलासा नाही, सुप्रीम कोर्टाने फेटाळली याचिका

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - सहाराचे प्रमुख सुब्रतो रॉय यांची गुंतवणूकदारांचे पैसे परत न केल्याप्रकरणी अटकेत ठेवण्यास आव्हान देणारी याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळली आहे. पैसे परत करण्यासंदर्भात रॉय यांनी नवीन प्रस्ताव सादर करावा, त्यानंतर त्यांचे म्हणणे ऐकूण घेतले जाणार असल्याचे कोर्टाने स्पष्ट केले आहे.

गुंतवणूकदारांचे 20,000 हजार कोटी रुपये परत करण्याच्या सुप्रीम कोर्टाच्या आदेशाचा अवमान केल्या प्रकरणी रॉय यांच्यासह सहारा समुहाचे दोन संचालक सध्या तुरुंगात आहेत. सुप्रीम कोर्टाने याआधी रॉय यांना सशर्त जामीन देण्यास मंजुरी दिली होती. मात्र त्यासाठी रॉय यांनी 10 हजार कोटी रुपये जमा करावे त्यापैकी 5,000 कोटी बँक गॅरंटीच्या स्वरुपात तर उर्वरीत 5,000 कोटी रोख जमा करण्याची अट घालण्यात आली होती. पण पैसे जमा करण्यासाठी रॉय यांचे तुरुंगातून बाहेर पडणे गरजेचे असल्याचे सहारा समुहाच्या वतीने सांगण्यात आले होते. मात्र न्यायालयाने त्याला मान्यता दिलेली नाही. दरम्यान सहारा समुहाने त्यांच्याकडे असेलेल्या मालमत्तेसंबंधी न्यायालयाला माहिती दिली आहे.