आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सहारा प्रमुखांना 600 कोटी भरण्याचे निर्देश, पॅरोलची मुदत ६ फेब्रुवारीपर्यंत

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - सर्वोच्च न्यायालयाने सहारा उद्योग समूहाचे प्रमुख सुब्रत रॉय यांच्या पॅरोलची मुदत ६ फेब्रुवारीपर्यंत वाढवली. त्यांना या तारखेपर्यंत सेबीच्या खात्यात ६०० कोटी रुपये जमा करावे लागतील.

सहाराला गुंतवणुकदारांचे २४ हजार कोटी परत करायचे आहेत. आजवर ११ हजार कोटी परत केले आहेत. उर्वरित रक्कम अडीच वर्षांत परत केली जाईल, असे सहाराने दिलेल्या पेमेंट योजनेत म्हटले आहे. त्यावर तुमच्याकडे १.८७ लाख कोटींची संपत्ती आहे, असे तुम्हीच म्हणाले होते. मग तुम्ही २९ हजार कोटी परत करू शकत नाही का? असा सवाल न्यायालयाने केला. सर्वोच्च न्यायालयाचा आदेश न मानल्यामुळे ६८ वर्षीय सुब्रत रॉय यांना मार्च २०१४ मध्ये अटक करण्यात आली होती.
बातम्या आणखी आहेत...