आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sahara Chief Subrata Roy In Supreme Court Latest News

गुंतवणूकदारांच्या पैशांसाठी विकणार संपत्ती; \'सहारा\'श्रींनी कोर्टात दिली माहिती

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्‍ली- गुंतवणूकदारांचे सुमारे 20 हजार कोटी रुपये परत करण्यासाठी 'सहारा'चे प्रमुख सुब्रतो रॉय यांनी आपली संपत्ती विकण्याची तयारी दाखविली. सुब्रतो रॉय यांनी आज (मंगळवार) सुप्रीम कोर्टात ही माहिती दिली. कोर्टाच्या आदेशाचे पालन न केल्याने सहाराश्रींची कोर्टाने चांगलीच कानउघाडणी केली. त्यानंतर सुब्रतो यांनी न्यायदेवतेची माफीही मागितली. भविष्यात कोर्टाने दिलेल्या आदेशांचे पालन करू असे आश्वासन दिले. मात्र सुब्रतो यांना कोर्टाने 11 मार्चपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली.

सुब्रतो रॉय यांची रवानगी तिहार तुरुंगात होणार आहे. रॉय यांना पोलिसांनी अटक केल्यानंतर ते पोलिस कोठडीत होते. या प्रकरणी 11 मार्चला सुनावणी होणा आहे. परंतु गुंतवणूकदारांचे रुपये परत करण्याबाबत रॉय ठोस पुरावे ठेऊन कोर्टात येतील, तेव्हाच 11 मार्चपूर्व सुनावणी होऊ शकेल, असेही कोर्टाने स्पष्ट केले. याशिवाय कंपनीच्या अन्य दोन संचालकांना दिल्लीतच न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश देण्यात आले. केवळ महिला संचालक वंदना भार्गव यांना ताब्यात न घेण्याचे आदेश कोर्टाने दिले आहेत

सुब्रतो रॉय यांना मंगळवारी कोर्टात हजर केले असता त्यांनी कोर्टाकडे गुंतवणूकदारांना रुपये परत देण्यासाठी कालवधी वाढवून देण्याची मागणी केली. परंतु सुब्रतो रॉय यांनी गुंतवणूकदारांचे रुपये परत करण्यासंदर्भात कोणतेही ठोस पुराव कोर्टात सादर केला नाही. कोर्ट तोंडी आश्वासन गृहीत धरत नाही. विशेष म्हणजे रॉय यांच्याकडे बॅंक गॅरंटीही नाही. आपल्या संपत्तीचा तपशील कोर्टात सादर केला नाही. त्यामुळे गुंतवणूकदारांचे पैसे परत करण्यासाठी आपली संपत्ती विकण्याची तयारी रॉय यांनी दर्शवली असली तरी त्यांनी दिलेल्या प्रस्तावावर कोर्ट समाधानी नसल्याचे स्पष्ट झाले आहे.

दरम्यान, सुब्रतो रॉय यांच्यावर मंगळवारी सुप्रीम कोर्ट परिसरात काळी शाई फेकण्यात आल्याने एकच खळबळ माजली. ग्वाल्हेर येथील वकील मनोज शर्मा यांनी हा प्रकार केला आहे. या घटनेनंतर पोलिसांनी मनोज शर्माला ताब्यात घेतले आहे.

दरम्यान, गुंतवणूकदारांचे 20 हजार कोटी रुपये थकवल्याप्रकरणी न्यायालयाने त्यांच्या अटकेचे आदेश दिले होते. शेवटी त्यांनी शुक्रवारी पोलिसांसमोर आत्मसर्पण केले. अटकेनंतर त्यांना लखनौच्या एका गेस्टहाऊसमध्ये ठेवण्यात आले होते. लखनौहून दिल्ली जाण्यासाठी त्यांना पोलिसांच्या वाहनात बसण्यास सांगण्यात आले. परंतु त्यांनी त्यास नकार दिला आणि स्वत:च्या वाहनातूनच जाण्याचा हट्ट धरला होता. शेवटी सुब्रतो रॉय यांच्या लवाजम्यासह पोलिस दिल्लीत पोहोचले.

पुढील स्लाइडवर क्लिक करून पाहा, सुब्रतो रॉय यांच्यावर काळी शाई फेकणारा वकील..