आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sahara Chief Subrata Roy To Remain In Jail, SC Rejects Bail Plea

सहाराचा प्रस्ताव पुन्हा अमान्य; आज पुन्हा सुनावणी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - सहारा प्रमुख सुब्रतो रॉय यांचा तुरुंगातील मुक्काम वाढला आहे. गुंतवणूकदारांचे 20 हजार कोटी परत करण्यासाठी सहारा समूहाने मंगळवारी सादर केलेल्या नव्या प्रस्तावावर सर्वोच्च न्यायालयाने विचार करण्यास नकार दिला आहे. प्रस्ताव सुनावणीच्या एका दिवसाआधी आणण्याचे निर्देश यापूर्वीच कोर्टाने दिले होते. पुढील सुनावणी बुधवारी होणार आहे.

सहाराने प्रस्ताव सादर करताच कोर्ट म्हणाले की, तो रजिस्ट्री अंतर्गत दाखल करावा. सहाराच्या वकिलांनी सुब्रतो व इतर दोघा संचालकांची जामिनावर सोडण्याची मागणी करत सांगितले की, या तिघांना तुरुंगात पाठवण्याचा आदेशच बेकायदेशीर होता. मुलभूत हक्कांचे उल्लंघनाचे प्रकरण दाखवून आम्ही त्याला आव्हान देऊ शकतो. रॉय गेल्या चार मार्चपासून तिहार कारागृहात कैदेत आहे.

सहाराचा नवा प्रस्ताव
० वर्षभरात 20 हजार रुपये टप्प्याटप्प्यांत परत केले जाणार.
० अडीच हजार कोटींचा पहिला हप्ता तीन दिवसांत देऊ.
० 3500 कोटींचे तीन हप्ते जून, सप्टेंबर व डिसेंबरमध्ये अदा केले जातील.
० उर्वरित 7 हजार कोटी पुढील वर्षी 15 मार्चपर्यंत अदा केले जातील.