आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सुब्रतो रॉय तूर्तास तुरुंगातच, हॉटेल विकण्यास परवानगी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - सहारा समूहाचे प्रमुख सुब्रतो रॉय यांचा मुक्काम तूर्तास तुरुंगातच राहणार आहे. त्यांची जामिनाच्या अटी शिथिल करण्यासंबंधीची याचिका सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी राखून ठेवली. मात्र, पैशांची व्यवस्था करण्यासाठी सहारा समूहाला न्यूयॉर्क, लंडन येथील तीन हॉटेल्समधील भागीदारी विकण्यास न्यायालयाने परवानगी दिली.
गुरुवारी सहारा समूहाने पुन्हा सांगितले की, सुब्रतो रॉय तुरुंबाहेर आल्याशिवाय रकमेची व्यवस्था करणे अशक्य आहे. सर्वोच्च न्यायालयाने रॉय यांच्या जामिनासाठी पाच हजार कोटी रुपये रोख व तितक्याच रकमेची बँक गॅरंटी मागितली आहे. न्यायालयाने ही रक्कम सेबीकडे जमा करण्याचे आदेश सहारा समूहाला दिले; परंतु सहाराने तो आदेश मानला नाही.