आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sahara Plea In Court, Release Subrata, Global Buyers Won't Visit Tihar

सुब्रतो यांच्या नजरकैदेचाही प्रस्ताव कोर्टाने फेटाळला, रॉय 16 एप्रिलपर्यंत तिहारमध्येच

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - न्यायालयाच्या अवमानना प्रकरणात सहाराप्रमुख सुब्रतो रॉय यांना आणखी काही दिवस कोठडीतच काढावे लागणार आहेत. सहाराकडून दाखल झालेला आणखी एक प्रस्ताव सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी फेटाळून लावला. यात रॉय यांना तिहार तुरुंगाऐवजी इतर ठिकाणी नजरकैदेत ठेवण्याची विनंती सहाराने केली होती.
सहाराचे वकील राम जेठमलानी युक्तिवादात म्हणाले, गुंतवणुकदारांची रक्कम परत करण्यासाठी सहारा मालमत्ता विकण्यासाठी आंतरराष्ट्रीय खरेदीदारांच्या संपर्कात आहे. मात्र एकही खरेदीदाराला सौद्यासाठी तुरुंगात रॉय यांची भेट घ्यावीशी वाटणार नाही. यामुळे कोर्टाने वाटल्यास सहाराप्रमुखांना तिहारऐवजी दुसर्‍या ठिकाणी नजरकैदेत ठेवावे. मात्र न्यायमूर्ती के.एस. राधाकृष्णन व जे.एस. खेहर यांच्या पीठाने हा युक्तिवाद फेटाळला. याची पुढील सुनावणी 16 एप्रिलला होणार आहे.
सुब्रतो रॉय यांच्यासह त्यांच्या कंपन्यांचे दोन संचालक 4 मार्चपासून तिहारमध्ये कोठडीत आहेत. त्यांच्या जामिनासाठी कोर्टाने 10 हजार कोटी जमा करण्याची अट घातलेली आहे. यापैकी रोख पाच हजार कोटी सेबीकडे तर पाच हजार कोटींची बँक हमी देण्यास सांगितलेले आहे.