आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sahara Sells Vasai Plot For Rs 1111 Crore Court Fumed

सहाराने 1111 कोटींत विकला भूखंड; तुरुंगात मजा वाटत आहे सुब्रतो रॉय यांना, कोर्टाची टीप्पणी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - गुंतवणूकदारांच्या कोट्यवधी रुपयांचा परतावा न केल्या प्रकरणी मार्चपासून तुरुंगात असलेल्या सुब्रतो रॉय यांच्या सहारा ग्रुपने मुंबई उपनगरातील वसई येथील 265 एकर परिसरात पसरलेली मालमत्ता 1111 कोटी रुपयांमध्ये विक्री केली आहे. सुब्रतो रॉय जामानीसाठी 30 हजार कोटी रुपये गोळा करण्याचा प्रयत्न करत आहेत. दुसरीकडे, कोर्टाने सुब्रतो रॉय यांच्या सुटकेसाठी सहारा ग्रुप करत असलेल्या प्रयत्नांवर नाराजी व्यक्त करत टीप्पणी केली आहे, की सहारा प्रमुखांना तुरुंगात राहाणे आवडत असल्याचे वाटते, त्यामुळेच त्यांच्याकडून सकारात्मक प्रयत्न होत नाहीत.
सहाराच्या भूखंडावर उभारली जाणार टाऊनशिप
मुंबईतील वसई येथील सहाराच्या भूखंडाचा सौदा हा फारमोठा सौदा असल्याचे मानले जाते. या भूखंडाची खरेदी साई रेडान कंपनीने केली आहे. ते येथे टाऊनशिप उभारणार आहे. तर, सहाराने या डीलबद्दल कोणतीच माहिती दिलेली नाही. साई रेडानचे प्रवक्त्याने सांगितले, की हा भूखंड सध्या कृषिसाठी आरक्षीत आहे. आम्ही त्याचा अ-कृषक वापरासाठी (नॉन अॅग्रीकल्चर) अर्ज करणार आहोत. वसई रेल्वे स्टेशनपासून दिड किलोमीटर अंतरावर दोन गावांमध्ये पसरलेला हा भूखंड आहे. कधीकाळी सहारानेच येथे टाऊनशिप उभारण्याचे स्वप्न पाहिले होते.
कोर्टाची तिखट टीप्पणी
सुब्रतो रॉय यांच्या जामीनावर शुक्रवारी सुप्रीम कोर्टात सुनावणी झाली. यावेळी कोर्टाने म्हटले, की सहारा प्रमुख जिथे आहे, तिथे ते आरामात आहेत. जर ते आरामात नसते तर त्यांनी तुरुंगातून बाहेर पडण्यासाठी जामीनासाठीची रक्कम गोळा करण्याचे प्रयत्न केले असते. सहाराकडून जामीनासाठीचा नवा प्रस्ताव शुक्रवारी कोर्टात सादर करण्यात आला त्यावरही कोर्टाने नाराजी व्यक्त केली. कोर्ट म्हणाले, 'तुम्ही काडीचाही प्रयत्न केलेला दिसत नाही. कारण 30 हजार कोटी फार मोठी रक्कम नाही. आमच्या वाचनात आले आहे, की तुमच्याकडे 1 लाख 80 हजार कोटींची संपत्ती आहे.'