आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Saif And Kareena Also Have Secret Offshore Dealings In Tax Havens Country

पनामा पेपर लिक: सैफ-करीनासह \'व्‍हिडीओकॉन\'चे वेणुगोपाल धूत यांचे नाव

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्‍ली- कर वाचवण्‍यासाठी दुस-या देशांमध्‍ये पैसे दडवून ठेवणार्‍यांची यादी दिवसेंदिवस वाढतच आहे. बॉलीवुड कपल सैफ अली खान-करीना कपूर व तिची थोरली बहीण करिश्‍मा कपूर यांच्‍यासह व्‍हिडीओकॉन कंपनीचे मालक वेणुगोपाल धूत यांचे नाव आता उघड झाले आहे. आंतरराष्ट्रीय संघटना 'आयसीआयजे'ची पनामा देशातील विधी सल्लागार कंपनी 'मोसेक फोन्सेका'चे दस्तऐवज सार्वजनिक केले आहेत.

काय आहे करीना आणि सैफ यांच्‍या भागिदारीचे सत्‍य..
- मार्च 2010 मध्‍ये आयपीएलची पुणे फ्रँचाइजी मिळवण्‍यासाठी 10 लोकांनी कंसोर्शियम तयार केली होती.
- यामध्‍ये सैफ अली खान, करिश्‍मा कपूर, करीना कपूर व व्‍हिडीओकॉनचे वेणुगोपाल धूत यांचा सहभाग होता.
- कंसोर्शियमने एक एमओयू साइन करून P-Vision Sport Private Limited नावाची कंपनी तयार केली.
- या कंपनीत सर्व 10 लोकांची भागिदारी होती.
- मोसेक फोंसेकाकडून प्राप्‍त एमओयूनुसार कंसोर्शियममध्‍ये 15 टक्‍के भागिदारी Obdurate Limited कंपनीची होती.
- ही कंपनी ब्रिटिश व्हर्जिन आयर्लंडमध्‍ये रजिस्‍टर होती.
- विशेष म्‍हणजे आयपीएलची फ्रँचाइजी खरेदी केल्‍यानंतर ही कंपनी बंद करण्‍यात आली.
आयपीएलची बोली आणि भागिदारीचे सत्‍य..
- आयपीएल पुणे फ्रँचायजी मिळवण्‍यासाठी सैफ-करीना यांच्‍यासह 10 लोकांची वेगवेगळी भागिदारी होती.
- यामध्‍ये सुमारे 33 टक्‍के भागिदारी ही क्रोडिया कुटुंबियांची होती.
- अतुल क्रोडियांची 9 व पत्‍नी वर्षा यांची 9 टक्‍के भागिदारी होती.
- व्‍हिडीयोकॉनचे वेणुगोपाल धूत यांनी 24.5 टक्‍के भागिदारी व्‍हिडीयोकॉन इंडस्‍ट्री लिमिटेडच्‍या नावाने खरेदी केली.
- 5 टक्‍के भागिदारी व्‍हिडीयोकॉन इंटरनॅशनल इलेक्‍ट्रॉनिक्‍स लिमिटेडच्‍या नावाने खरेदी केली.
- मुंबईत राहणारे मनोज जैन यांचीही यामध्‍ये 9 टक्‍के भागिदारी आहे.
पुढील स्‍लाइड्सवर वाचा, पनामा पेपर्स लीक पार्ट - 3 मध्‍ये नीरा राडियांचे नाव..