आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सायनापेक्षा सिंधू ठरली महागडी खेळाडू, बॅडमिंटनपटूंची बोली प्रक्रिया : कॅरोलिन मरिन सर्वात महागडी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली -  रिओ ऑलिम्पिकची सुवर्णपदक विजेती खेळाडू स्पेनची कॅरोलिन मरिन भारतात होणाऱ्या प्रीमियर बॅडमिंटन लीग-२ (पीबीएल-२) मध्ये खेळणार आहे. या स्पर्धेसाठी खेळाडूंच्या बोली प्रक्रियेत तिला सर्वात जास्त ६१.५ लाख रुपये किंमत मिळाली. तिला हैदराबाद हंटर्सने खरेदी केले. द. कोरियाची महिला खेळाडू सुर जी ह्यून दुसरी महागडी खेळाडू ठरली. तिला मुुंबई रॉकेट्सने ६० लाख रुपयांत खरेदी केले. डेन्मार्कचा पुरुष खेळाडू जॅन ओ जोर्गेनसेनवर तिसरी मोठी बाेली लागली. त्याला तब्बल ५९ लाख रुपयांत दिल्ली एसर्सने आपल्या संघात सामील केले.
 
रिओ ऑलिम्पिकची रौप्यपदक विजेती पी. व्ही. सिंधूला धक्कादायकरीत्या (चेन्नई स्मॅशर्स) केवळ ३९ लाख रुपये किंमत मिळाली, तर सिंधूची वरिष्ठ खेळाडू सायना नेहवालला अवध वॉरियर्सने केवळ ३३ लाख रुपयांत खरेदी केले. भारतीयांत किदाम्बी श्रीकांत सर्वात महागडा ठरला. त्याला अवध वॉरियर्सने ५१ लाखांत खरेदी केले. प्रीमियर बॅडमिंटन लीग स्पर्धेला १ जानेवारीपासून हैदराबादेत सुरुवात होत आहे. तर १४ फेब्रुवारी रोजी स्पर्धेचे फायनल खेळवले जाईल.   

सिंधूला कमी किंमत का ?  
बोली प्रक्रियेनंतर प्रश्न एकच होता की ऑलिम्पिक रौप्यपदक विजेती असताना सिंधूला केवळ ३९ लाख रुपये किंमत  का मिळाली?.. यावर सिंधू म्हणाली, ‘आमच्यासाठी खेळ अधिक महत्त्वाचा आहे, किंमत नव्हे.’

सायनावर बोली नाही :
रिओ ऑलिम्पिकचे सुमार प्रदर्शन आणि गुडघ्याच्या दुखापतीनंतर बोली प्रक्रियेच्या पहिल्या फेरीत सायनावर कोणीच बोली लावली नाही. दुसऱ्या फेरीत तिच्यावर बोली लागली.

दिग्गाजंचा स्पर्धेत सहभाग..  
जगभरातील सर्व दिग्गज खेळाडू या लीगमध्ये सहभागी होण्यासाठी येत आहेत. सर्वांना सिंधू आणि मरीन यांच्या सामन्याची प्रतीक्षा असेल, असे पी. गोपीचंद म्हणाले.
 
बातम्या आणखी आहेत...