आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भारताच्या अकबरुद्दीन यांनी UN मध्ये वाजवला पाकचा बँड, वाचा काय म्हणाले

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
संयुक्त राष्ट्रे - हिजबुल मुदाहिद्दीन या दहशतवादी संघटनेचा कमांडर बुऱ्हान वाणी याचा मृत्यू आणि काश्मीर प्रश्न हे दोन मुद्दे पाकिस्तानने संयुक्त राष्ट्रांत मांडल्याने संतप्त झालेल्या भारताने पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर दिले आहे. ‘पाकिस्तान दहशतवाद्यांचे गुणगान करत आहे, पाकिस्तानला दुसऱ्यांचा भूभाग हडपायचा आहे,’ असा आरोप भारताने केला आहे.
संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेत बुधवारी मानवी हक्कांबाबत चर्चा झाली. त्या वेळी पाकिस्तानच्या राजदूत मलिहा लोधी यांनी काश्मीर आणि वाणीच्या मृत्यूबद्दल प्रक्षोभक वक्तव्य केल्यानंतर भारताचे संयुक्त राष्ट्रांतील कायमस्वरूपी प्रतिनिधी सय्यद अकबरुद्दीन यांनी पाकिस्तानला चांगलेच फटकारले.
वानी हा काश्मिरी नेता : मलिहा लोधी : मलिहा लोधी यांनी आपल्या वक्तव्यात काश्मीरचा तसेच वानीच्या मृत्यूचा उल्लेख केला. त्या म्हणाल्या की, वानी हा काश्मीरचा नेता होता. भारतीय सुरक्षा दलांनी त्याची काश्मीरमध्ये हत्या केली. हे मानवी हक्कांचे उल्लंघन आहे. काश्मीरच्या जनतेला स्वयंनिर्णयाचा अधिकार नाकारला जात आहे. तेथे लोकांना बेकायदेशीरपणे डांबले जात असून त्यांच्यावर अत्याचार केला जात आहे. गेल्या आठवड्यात भारतीय सुरक्षा दलांनी बुऱ्हान वाणी या काश्मिरी नेत्याची तसेच अनेक निरपराध काश्मिरी नागरिकांची केलेली हत्या हे त्याचे अलीकडील ताजे उदाहरण आहे.

लोधी यांच्या या आरोपांना अकबरुद्दीन यांनी चोख प्रत्युत्तर दिले. ते म्हणाले की, पाकिस्तान दहशतवाद्यांचे गुणगान करत आहे. पाकिस्तानचे याबाबतचे रेकॉर्ड चांगले नाही. त्यामुळेच त्या देशाला संयुक्त राष्ट्रांच्या मानवी हक्कविषयक समितीत स्थान मिळू शकलेले नाही. काश्मीरचा मुद्दा युनोत उपस्थित केल्याबद्दल पाकिस्तानवर टीका करताना अकबरुद्दीन म्हणाले की, पाकिस्तान युनोच्या व्यासपीठाचा गैरवापर करत आहे हे खेदजनक आहे. पाकिस्तानने यापूर्वीही असे प्रकार केले आहेत. पाकिस्तान दहशतवाद्यांचे गुणगान करतो, इतरांच्या भूभागावर डोळा ठेवतो, दहशतवाद हेच त्या देशाचे अधिकृत धोरण आहे, संयुक्त राष्ट्रांनी प्रतिबंध घातलेल्या अनेक दहशतवाद्यांना पाकिस्तानने आश्रय दिला आहे. भारताने नेहमीच सर्वांच्या मानवी हक्कांचे संरक्षण केले आहे.
बान की मून यांनी व्यक्त केली चिंता
काश्मीरमधील तणावाच्या परिस्थितीवर संयुक्त राष्ट्रांनी चिंता व्यक्त केली आहे. आणखी हिंसाचार होऊ नये यासाठी सामंजस्याने स्थिती हाताळली जाईल, तसेच शांततेच्या मार्गाने तोडगा काढला जाईल, अशी अपेक्षा संयुक्त राष्ट्रांचे सरटिचणीस बान की मून यांनी व्यक्त केली.
पुढील स्लाइड्सवर वाचा, काय म्हणाले अकबरुद्दीन पाकिस्तानबाबत..

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)


बातम्या आणखी आहेत...