आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सलमान हिट अँड रन केस : त्या प्रश्नांची उत्तरे जे तुमच्या मनात आहे

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई / नवी दिल्ली - अभिनेता सलमान खानला हिट अँड रन प्रकरणी सेशन्स कोर्टाने दोषी ठरवून दिलेल्या पाच वर्षांच्या शिक्षेला शुक्रवारी हायकोर्टाने स्थगिती दिली आहे. हायकोर्टात त्याला कोणत्या ग्राउंडवर दिलासा मिळाला ? सलमानच्या बाजूने काय युक्तीवाद करण्यात आला ? सेशन्स कोर्ट प्रमाणेच हायकोर्टातही हे प्रकरण प्रदीर्घकाळ चालेल ? या तुमच्या मनात उठणाऱ्या प्रश्नांची उत्तरे तज्ज्ञांच्या माध्यमातून शोधण्याचा 'दिव्य मराठी डॉट कॉम'ने प्रयत्न केला आहे.
कोणत्या आधारावर शिक्षेला मिळाली स्थगिती ?
सुप्रीम कोर्टाचे प्रसिद्ध वकील कपिल सांख्ला यांनी दिव्य मराठी डॉट कॉमला सांगितले, 'सीआरपीसी कलम 389 नुसार प्रत्येक व्यक्तीला जामीनाचा अधिकार आहे. सलमान गेल्या 12 वर्षांपासून जामीनावर बाहेर आहे. त्याने कधीही पळून जाण्याचा प्रयत्न केला नाही, की ट्रायल दरम्यान त्याने कोणता गुन्हा केला नाही. त्यामुळे कोर्टाच्या दृष्टीने त्याला जामीन मिळण्याचा पूर्ण अधिकार आहे. हायकोर्टाने याच बाबी अधोरेखित केल्या आणि दोषीचे अपील दाखल करुन घेतले. त्याच बरोबर सुनावणीतूनच या प्रकरणाचे मेरिट काय आहे हे निश्चित करण्याचे नक्की केले. सीआरपीसी 374 नुसार जोपर्यंत सुनावणी पूर्ण होत नाही, तोपर्यंत सस्पेंशन ऑफ सेंटेंस कायम ठेवले जाते.'
कोणता युक्तीवाद सलमानच्या बाजूने झाला ?
- ज्येष्ठ वकील सांख्ला यांच्या म्हणण्यानुसार, कार मध्ये किती लोक होते हे निश्चित झाले नाही. कारची स्पिड किती होती हे नक्की झाले नाही, रवींद्र पाटील आणि कमाल खान यांची साक्ष नोंदली गेली नाही, हा बचाव पक्षाचा युक्तीवाद कामी आला. त्यामुळे हायकोर्टाने जामीनाचा अर्ज मंजूर केला.
- सलमानचे वकील अमित देसाई आणि श्रीकांत शेवदे म्हणाले, कमाल खानचा जबाब नोंदवला गेला नाही. हॉटेलमधून निघाल्यानंतर मार्ग का बदलला हे सांगण्यास रवींद्र पाटील असमर्थ ठरले. सलमानच कार चालवत होता, हे कनिष्ठ न्यायालयात प्रॉसिक्यूशन सिद्ध करु शकले नाही. रवींद्र पाटील यांनी प्रत्यक्ष साक्षीदार म्हणून साक्ष दिली होती, त्यात त्यांनी सलमानच कार चालवत असल्याचे सांगितले होते मात्र नंतर त्यांचा क्षयरोगाने मृत्यू झाला होता.
प्रॉसिक्यूशनचे वकील काय म्हणाले ?
- प्रॉसिक्यूशनचे वकील संदीप शिंदे यांनी हायकोर्टाने अपील स्विकार करण्यास विरोध केला नाही. मात्र, शिक्षेला स्थगिती देण्यास आक्षेप घेतला. ते म्हणाले - कमाल खानचा जबाब पोलिसांनी नोंदवून घेतला नाही. तो ब्रिटनचा नागरिक असल्याने जबाब नोंदवून घेण्यासाठी उपलब्ध होऊ शकला नव्हता. सुनावमी पूर्ण होण्याच्या काही दिवस आधी सलमानने दावा केला की गाडी तो चलवत नव्हता तर अशोक सिंह चालवत होता. प्रकरणात निर्णयाची वेळ आली असताना ऐनवेळी सलमानने जबाब का बदलला ? घटनेच्या वेळी सलमानला माहित होते, की रॅश आणि मद्यपान करुन गाडी चालवण्याचे परिणाम काय होतील ? सलमानच्या रक्त नमुन्यांमध्ये मोठ्या प्रमाणात अल्कोहल सापडले होते. त्यामुळे त्याची शिक्षा कायम ठेवली पाहिजे.
जज काय म्हणाले ?
- जजने सेशन्स कोर्टाच्या निर्णयाविरुद्धचे सलमानचे अपील स्विकारले. जस्टीस अभय ठिपसे म्हणाले - 'सलमान अनेक वर्षांपासून जामिनावर बाहेर आहे. त्यांच्या स्वातंत्र्यावर कोणताही अंकूश आणता येणार नाही. सर्वसामान्यपणे अशा प्रकरणात अपील स्विकाले जाते आणि आरोपीला जामीन मंजूर केला जातो. हे असे प्रकरण नाही ज्यात अपीलावर सुनावणी होईपर्यंत आणि निर्णय येईपर्यंत आरोपीला तुरुंगात ठेवण्याची गरज आहे. जेव्हा अपील स्विकारले गेले आहे आणि त्यावर निर्णय प्रलंबित आहे तोपर्यंत त्याच्या अधिकारांसोबत का छेडछाड व्हावी ? अनेक प्रकरणात लोक पूर्ण शिक्षा भोगतात आणि नंतर कोर्टाचा निर्णय येतो की तो निर्दोष आहे.' या टिप्पणीनंतर हायकोर्ट जजने सलमानच्या शिक्षेला स्थगिती दिली आणि त्याला जामीन मंजूर केला.
आता हायकोर्टात हे प्रकरण निकाली निघायला किती दिवस लागतील ?
- सुप्रीम कोर्टाचे वकील कपिल सांख्ला यांचे म्हणणे आहे, की - ट्रायल कोर्टात भलेही 13 वर्षे लागली असतील पण हायकोर्टात हे प्करण निकाली निघायला अवघे काही महिने लागतील. हायकोर्ट त्याची पाच वर्षांची शिक्षा कमी करुन दंडाची रक्कम वाढवण्याची शक्यता आहे. किंवा शिक्षा कायम देखील ठेवू शकते. हायकोर्टाच्या निर्णयानंतर बचावपक्ष सुप्रीम कोर्टात जाऊ शकतो.
पुढील स्लाइडमध्ये, सलमानला विदेशात जाता येणार की नाही ?