आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सलमानने न्‍यायालयात दिले खोटे वैद्यकीय प्रमाणपत्र?

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्‍ली- अभिनेता सलमान खान मोठ्या अडचणीत येण्‍याची शक्‍यता आहे. सलमान खानने न्‍यायालयात सादर केलेल्‍या वैद्यकीय प्रमाणपत्रावर संशय व्‍यक्त करण्‍यात आला आहे. प्रमाणपत्राची सत्यता पडताळून पाहावी, अशी मागणी राजस्‍थानच्‍या बिश्नोई समाजाने केली आहे.

सलमान खानने काळवीट शिकारप्रकरणी वैद्यकीय प्रमाणपत्र सादर करुन न्‍यायालयात येण्‍याचे टाळले. उपचारासाठी अमेरिकेत गेल्‍याचे त्‍याने सुनावणीच्‍यावेळी वकीलामार्फत सांगितले होते. ही बाब मान्‍य करुन न्‍यायालयाने सलमानला प्रत्‍यक्ष हजर न राहण्‍याची मुभाही दिली. परंतु, त्‍याने सादर केलेले वैद्यकीय प्रमाणपत्र खोटे असल्‍याचा आरोप करण्‍यात आला आहे. सलमानविरुद्ध बिश्नोई समाजात रोष वाढत आहे. समाजाच्‍या वकीलाने सलमानचे वैद्यकीय प्रमाणपत्र तपासण्‍याची मागणी केली आहे. त्‍यांनी सांगितले की, सलमान आजारी असून 10 दिवस प्रवास न करण्‍याचा सल्‍ला देण्‍यात आल्‍याचे प्रमाणपत्रात म्‍हटले आहे. परंतु, सुनावणीच्‍या दुस-याच दिवशी तो विमानने अमेरिकेतून भारतात परतला. हे कसे? या वैद्यकीय प्रमाणपत्राची सत्‍यता पडताळलीच पाहिजे, असे वकील म्‍हणाले.

सलमान खान अमेरिकेतून परतल्‍यानंतर संजय दत्तला भेटला होता. जवळपास 5 तास तो संजय दत्तसोबत होता. दरम्‍यान, 2002 मधील हिट ऍण्‍ड रन प्रकरणाचीही सुनावणी 8 एप्रिलपर्यंत टळल्‍याने सलमानला आणखी एक दिलासा मिळाला.