आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

हिट अँड रन केस : सलमानच्या सुटकेला आव्हान, SC ने स्वीकारली याचिका

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - हिट अँड रन प्रकरणी अभिनेता सलमान खानच्या सुटकेविरोधात आव्हान देणारी राज्य सरकारची याचिका सर्वोच्‍च न्‍यायालयाने मंगळवारी स्वीकारली. बॉम्‍बे उच्‍च न्‍यायालयाने पुराव्याअभावी सलमानला निर्दोष मुक्त केले होते. या निर्णयाविरोधात राज्‍य सरकारने 22 जानेवारी रोजी ही याचिका दाखल केली होती.
फास्ट ट्रॅक सुनावणी ची मागणी फेटाळली...
> या प्रकरणाची सुनावणी फास्ट ट्रॅकमध्‍ये व्‍हावी, अशी मागणी राज्‍य सरकारच्‍या वतीने अटॉर्नी जनरल मुकूल रोहतगी यांनी केली होती.
> मात्र, न्‍यायमूर्ती जे. एस. खेहर यांच्‍या अध्यक्षतेखालील खंडपीठाने ही मागणी फेटाळून लावली.
> सुप्रीम कोर्टाने म्‍हटले, " जर या प्रकरणाची फास्ट ट्रॅक सुनावणी हवी असेल तर तुम्‍ही मुख्य न्यायाधीशांकडे मागणी करायला हवी होती. "
> दरम्‍यान, उच्‍च न्‍यायालयाच्‍या निर्णयाविरोधात सुनावणी व्‍हावी, ही राज्‍य सरकारची याचिका सर्वोच्‍च न्‍यायालयाने दाखल करून घेतली.
सलमानचे वकील काय म्‍हणाले
सर्वोच्‍च न्‍यायालयात यावर सुनावणी होत असेल तर त्‍याला आमचा काहीच आक्षेप नसेल, असे सलमानचे वकील कपिल सिब्बल म्‍हणाले.
14 वर्षांपूर्वीचे आहे प्रकरण
हिट अँड रन प्रकरण 28 सप्टेंबर 2002 रोजी मुंबईतील वांद्रे येथील एका बेकरीसमोरील फुटपाथवर घडले होते. फुटपाथवर झोपलेल्या पाच जणांवर सलमानची टोयोटा लँड क्रुजर गाडी चढली होती. या अपघातात एका जणाचा मृत्यू झाला आणि चार जखमी झाले होते. या प्रकरणी सलमानवर बेजाबदारपणे गाडी चालवण्याचा आरोप ठेवण्यात आला होता. दुसऱ्या दिवशी सकाळी त्याला अटक करण्यात आली आणि पोलिस स्टेशनमधून त्याला जामीन मिळाला होता.
(Pls Note- तुम्ही जर मोबाइलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करून इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरिंगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...