आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खुर्शीद बनले सैफ, गायले -कल हो न हो, जर्मनीच्या राजदूताने केला हिंदी गाण्याचा रिमेक

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - हे छायाचित्र पाहून आश्चर्यचकित होऊ नका. ते सोशल मीडियात येणारे मॉर्फ किंवा संपादित छायाचित्र नाही. विदेशी मुलीचा हात हाती घेतलेली ही व्यक्ती म्हणजे खरेखुरे सलमान खुर्शीदच आहेत. देशाचे माजी परराष्ट्रमंत्री. राजकारणाशिवाय ते वकिलीही करतात.
सलमान खुर्शीद यांनी अभिनेता म्हणून नवा डाव सुरू केला आहे. त्यांनी ज्यांचा हात हातात घेतला त्यांचे नाव आहे एलिस. भारतातील जर्मनीचे राजदूत मायकेल स्टेनर यांच्या त्या पत्नी आहेत. छायाचित्रात ते खाली डावीकडे आहेत. स्टेनर यांनी बॉलीवूडची प्रशंसा करण्यासाठी ‘लेबे जेटजट-कल हो न हो’या नावाचा व्हिडिओ बनवला आहे. तो २००३ मध्ये आलेल्या ‘कल हो ना हो’ या चित्रपटाच्या टायटल गीताचा रिमेक आहे. त्यात खुर्शीद यांनी सैफ अली खान, एलिस यांनी प्रीती झिंटा, तर मायकेल स्टेनर यांनी शाहरुखची भूमिका केली आहे.
स्टेनर यांच्या घरी शुक्रवारी रात्री या म्युझिक व्हिडिओचा प्रीमियर झाला. त्याला ‘कल हो न हो’ या गाण्याचे गीतकार जावेद अख्तरही उपस्थित होते. व्हिडिओवर खुर्शीद म्हणाले, ‘हे पाहा, जीवनाप्रमाणेच राजकारणातही उद्या आम्ही असू की नसू हे आम्हाला माहीत नसते. त्यामुळे जगायचे तोपर्यंत मजेत जगा.’ स्टेनर म्हणाले,‘मी आणि एलिसने १५० पेक्षा जास्त हिंदी चित्रपट पाहिले आहेत. व्हिडिओत काम करणे कठीण होते. पहिली अडचण म्हणजे मी ५० वर्षांपूर्वी शाळेत अभिनय केला होता. दुसरी-मला हिंदी येत नसल्याने गाण्याचे लिप सिंकिंग खूप कठीण होते.’

यावर फिरकी घेत जावेद अख्तर म्हणाले, माझा संशय खरा ठरला. राजकारणी - राजदूत उत्कृष्ट अभिनेते असतात, असे मला नेहमी वाटायचे. आता तर पुरावाही मिळाला.’